मनू भाकरला ‘पॅरिस’स्पर्श; पुरस्कार, बक्षिसांमुळे संपत्तीत भरभक्कम वाढ!

६० लाखांवरून पोहचली कोटीच्या घरात

मनू भाकरला ‘पॅरिस’स्पर्श; पुरस्कार, बक्षिसांमुळे संपत्तीत भरभक्कम वाढ!

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी युवा नेमबाज मनू भाकर देशाची शान बनली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने दोन कांस्यपदकावर आपले नाव कोरले. देशासाठी दोन पदके जिंकल्यानंतर मनू भाकरवर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. यासोबतच तिला अनेक प्रकारचे ब्रँड एंडोर्समेंट डील्स देखील मिळाले आहेत. यामुळेच तिच्या नेट वर्थमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकरच्या एकूण संपत्ती मोठी भर पडली आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनू भाकरची एकूण संपत्ती ६० लाख रुपये होती. मनूच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत नेमबाजी स्पर्धांसह काही ब्रँड ॲन्डॉर्समेंट्समधून मिळणारी बक्षीस रक्कम आहे, परंतु पॅरिस ऑलिम्पिकनंतर तिच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकरची संपत्ती १२ कोटींहून अधिक झाली आहे.

हे ही वाचा :

नेपाळ : भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, १४ जणांचा मृत्यू !

‘४० आमदार सोडून गेल्याने उद्धव ठाकरे अजून ट्रॉमात’

कमला हॅरिस यांनी औपचारिकपणे स्वीकारले अध्यक्षपदासाठीचे नामांकन

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंद !

ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकल्यानंतर, तिला अनेक जाहिरातींच्या ऑफर मिळाल्या आहेत, ज्यामध्ये मुख्यतः कोल्ड ड्रिंक ‘थम्स अप’ सारखी एक आहे. मनूने थम्स अपसोबत सुमारे दीड कोटी रुपयांचा करार केल्याची माहिती आहे. याशिवाय ‘नथिंग इंडिया’ आणि ‘परफॉर्मॅक्स’ सारख्या प्रमुख ब्रँडसोबतही तिने भागीदारी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी, मनू भाकर एका जाहिरातीसाठी ८ लाख ते ३० लाख रुपये आकारत होती, परंतु आता तिची ब्रँड व्हॅल्यू सुमारे १.५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मनू भाकरने वडिलांकडून १.५ लाख रुपये घेऊन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, मनू भाकराच्या उत्कृष्ट कामगिरीने तिला पुढील स्पर्धेसाठी विविध संस्थांकडून प्रायोजक मिळू लागले. याशिवाय, तिला प्रशिक्षण आणि कार्यक्रमांसाठी दरवर्षी ‘वार्षिक कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन’कडून (ACTC) एकूण रु. १,५०,६७,३९० चे आर्थिक सहाय्य देखील मिळते.

Exit mobile version