मंत्रालयाच्या जवळ भुयारीमार्गाचे काम सुरु असून हे काम एल अँड टी कंपनी करत आहे.भुयारीमार्ग बनवण्यासाठी ब्लास्ट करून काम पुढे सुरु ठेवले जाते.मात्र, या कामामुळे मंत्रालयातील आवारात दगड उडून पडले.ब्लास्टमुळे उडून दगड सरळ मंत्रालयाच्या आवारात पार्किंग केलेल्या गाड्यांवर आदळले. त्यामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. त्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या काचाही फुटल्या. अचानक झालेल्या या दगडांच्या वर्षावामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.या घटनेची पोलिसांनी चौकशी करत एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मंत्रालय ते विधानभवन जोडण्यासाठी भुयारीमार्गाचे काम सुरु आहे.हे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे.भुयारीमार्ग करण्यासाठी अंतर्गत ब्लास्टिंग करावे लागते. या स्फोटाचा आवाजही अतिशय भीतीदायक असतो.आज दुपारी २ च्या सुमारास हा ब्लास्ट केल्याने मंत्रालयाच्या परिसरात दगड उडून गाड्यांवर पडले आणि गाडयांच्या काचा फुटून नुकसान झाले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.ही घटना मंत्रालयाच्या मेन गेटजवळ घडली.
हे ही वाचा:
‘मी परत येईन’: भाजपच्या पोस्टरवर पंतप्रधान ‘टर्मिनेटर’च्या रूपात
सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना पोलिसांनी घेतले ताब्यात
जोहान्सबर्गमधील इमारतीत अग्नितांडव; ६३ जणांचा मृत्यू
८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!
या गेटमधून मंत्रालयातील सर्व मंत्री आणि अधिकारी तसेच सामान्य नागरिक येत असतात.अचानक पणे मंत्रालय आवारात दगड पडून गाड्यांच्या काचा फुटल्याने पोलीस आणि नागरिक अचंब झाले. मात्र, हे दगड येत असताना मंत्रालयाच्या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सुरक्षा रक्षकांनी याची चौकशी केल्यानंतर याचे मूळ कारण समजले.यानंतर पोलिसांकडून एल अँड टी कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.एल अँड टी कंपनीकडून चालू असलेल्या या भुयारीमार्गाच्या कामात निष्काळजीपणा दिसून आला आहे.