सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

देशातून मान्सून माघार घेण्याचा अपेक्षित दिवस शुक्रवार (१७ सप्टेंबर) होता. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता देशात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे भारतात अतिरिक्त ३३.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात झालेल्या १० टक्के कमतरतेमधील ४ टक्के तूट भरून निघाली आहे.

बुधवारी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार ओडिशा आणि पश्चिम बंगाल जवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे २५ सप्टेंबरपासून चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?

…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!

अवघ्या ५५ मिनिटांत लिव्हर आणि किडनी पोहोचले ५० किमीवर

बनावट छाप्याच्या नाट्यामुळे अंगावर आला काटा!

या महिन्याच्या अखेरपर्यंत तरी मान्सून देशातून परत जाण्याची शक्यता नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दोन वादळांमुळे आणि त्यांच्या समुद्रातील हालचालीमुळे मान्सून इतक्यात परतणार नसल्याचे हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपत्रा यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात सप्टेंबरच्या अखेरीस अजून एक वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान प्रणाली दर्शवत आहे. मात्र, त्यासाबंधित आता भाष्य करणे फार लवकर होईल, असेही हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपत्रा यांनी सांगितले. सध्या मध्य प्रदेशाच्या उत्तर भागात आणि उत्तर प्रदेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. रविवारी गुजरातमध्ये पाऊस पडू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version