ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या यशाबाबत बोलताना ‘धोकादायक ट्रेन्ड’ अशा शब्दांत चिंता व्यक्त केली होती. त्यावर भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी शाह यांना सुनावले आहे.
‘नासिरुद्दीन हे चांगले अभिनेते असले तरी त्यांचा हेतू चांगला नाही. हे मला अतिशय खेदपूर्वक सांगावे लागतेय,’ अशी टीका मनोज तिवारी यांनी केली आहे. ‘जेव्हा चित्रपटात एका दुकानात बसलेला मुलगा समोरून जाणाऱ्या बाईबाबत आक्षेपार्ह बोलतो, असे दाखवले जाते. तेव्हा नासिरसाहेब काही बोलत नाहीत,’ अशी टीका त्यांनी केली.
मनोज तिवारी यांनी ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचे कौतुक केले. हे दोन्ही चित्रपट सत्यकथेवर आधारित आहेत. जर नासिरुद्दीन यांना या चित्रपटाबाबत काही अडचण असेल तर त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे. बोलणे सोपे असते. मात्र ज्या प्रमाणे ते बोलत आणि वागत आहेत, ते बघता एक भारतीय म्हणून आणि एक माणूस म्हणून ते चांगली व्यक्ती नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.
हे ही वाचा:
‘मद्यधोरण चांगले होते तर मागे का घेतले?’
राजस्थानमधील पावसाने तोडला १०० वर्षांचा विक्रम
पाकला पराभूत करून भारताने रचला हॉकीत इतिहास
साक्षीच्या हत्येत वापरलेला चाकू सापडला; साक्षीच्या शरीरावर ३४ जखमा
नासिरुद्दीन शाह यांनी एका टीव्हीवृत्तवाहिनीशी बोलताना‘ भीड, अफवा, फराझ यांसारखे चांगले चित्रपट आपटले. कोणीच ते चित्रपट पाहायला गेले नाहीत. मात्र प्रेक्षक ‘ दे केरला स्टोरी’ बघायला गेले. हा चित्रपट मी पाहिलेला नाही आणि त्याबद्दल आतापर्यंत बरंच काही वाचून झाले असल्यामुळे तो पाहायची इच्छाही नाही,’ असे ते म्हणाले होते.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या यशाला त्यांनी घातक ट्रेन्ड असे संबोधून त्याची तुलना नाझी जर्मनीशी केली आहे. ‘हा धोकादायक ट्रेन्ड आहे, याबद्दल शंकाच नाही. आपण नाझी जर्मनीच्या दिशेने जात आहोत. हिटलरच्या काळातही त्याची स्तुती करणारे, त्याने देशवासींसाठी किती चांगले काम केले आहे आणि ज्युईश समाजाची कत्तल करून कसे चांगले केले आहे, हे दाखवणारे चित्रपट बनवले जायचे,’ याची आठवण त्यांनी करून दिली. अशी टीका होत असली तरी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाने आतापर्यंत २७ दिवसांत तब्बल २३० कोटींची कमाई केली आहे.