भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांनी राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव यांच्याबद्दल ते म्हणाले, काही लोकांची छाती ५६ इंच असते तर काही लोकांची ततेवढी जीभ असते. ५६ इंचाची छाती समाजासाठी काम करतेय तर ५६ इंचाची जीभ असणाऱ्यांकडून काहीही अपेक्षा करता येत नाही. काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्या विधानाबाबत मनोज तिवारी म्हणाले की, पक्षाने अशा नेत्यांना बाहेर काढले पाहिजे. पण ते असे करू शकत नाहीत कारण काँग्रेसने नेहमीच अशा लोकांचा अपमान केला आहे.
तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधताना मनोज तिवारी म्हणाले, तेजस्वी यादव स्वतःची ओळख करून देत आहेत. हे असे लोक आहेत जे त्यांच्या लांब जिभेने काहीही बोलतात आणि काहीच करत नाहीत. बिहारच्या लोकांनी त्यांना वेळ दिला होता, त्यांनी काय केले ते सांगा?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, काही लोकांची जीभ ५६ इंच असते तर काहींची छाती ५६ इंच असते. ५६ इंचाची छाती समाजासाठी काम करत आहे आणि ५६ इंचाच्या जिभेकडून आपण काहीही अपेक्षा करू शकत नाही.
हे ही वाचा :
अबू आझमी यांना औरंग्याचा पुळका, म्हणाले चांगला प्रशासक होता!
रोहितच्या वजनावरून काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवर बीसीसीआय संतापली
महाकुंभ मेळा संपला पण संगमात स्नान करण्यासाठी भाविकांची ये-जा सुरूच!
दिल्लीतील विजेच्या पायाभूत सुविधांची वाईट स्थिती आम आदमी पार्टीमुळे
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर केलेल्या टिप्पणीवर मनोज तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली. शमा मोहम्मदवर निशाणा साधत मनोज तिवारी म्हणाले, काँग्रेस लोकांना असे बोलायला लावते. विजेत्यांचा आणि खेळाडूंचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय आहे. जर काँग्रेसला काही करायचे असेल तर त्यांनी या नेत्याला पक्षातून काढून टाकावे. रोहित शर्मा आणि भारतीय संघाने भारतासाठी किती काम केले आहे हे सर्वांना माहिती आहे, परंतु काँग्रेस नेहमीच विजेत्यांचा अपमान करते, असे खासदार मनोज तिवारी म्हणाले.