कोई खेले रेल में.. कोई खेले जेल में.. बुरा ना मानो होली है!

मनोज तिवारींनी गाण्यामधून मारला केजरीवालांना टोला

कोई खेले रेल में.. कोई खेले जेल में.. बुरा ना मानो होली है!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे.दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप आणि टोमणे मारताना दिसत आहेत.आज होळीच्या मुहूर्तावर हा ट्रेंड कायम राहिला.भाजप खासदार यांनी होळी निम्मित आपल्या गाण्याच्या शैलीतून अरविंद केजरीवाल यांना टोमणे मारताना दिसले.

एएनआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी इतर लोकांसोबत होळी खेळत नाचताना दिसत आहेत.याचदरम्यान त्यांनी एक गाणे म्हटले आणि नाव न घेता केजरीवालांना टोला लगावला.ते गाणे गात म्हणाले, कोणी रेल्वेमध्ये खेळत आहे तर कोणी जेलमध्ये खेळत आहे..वाईट वाटून घेऊ नका..होळी आहे.

हे ही वाचा:

मालदीवच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी मुईझ्झुंना सांगितले…दुराग्रह सोडा, शेजाऱ्यांशी जुळवून घ्या!

ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

जे. पी. नड्डा यांच्या पत्नीची गाडी चोरीला

अलीगड, संभलमधील मशिदी ताडपत्रीने झाकल्या!

दरम्यान, मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातूनच चालवण्यास सुरुवात केली आहे.रविवारी (ता. २४) केजरीवाल यांनी तुरुंगातून पहिला आदेश जारी करत आपल्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.

Exit mobile version