29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख; नरवणे सीडीएस होणार?

मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख; नरवणे सीडीएस होणार?

Google News Follow

Related

भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे. १ मे पासून ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

इंजीनिअर्स कॉर्प्समधील ते असे पहिलेच अधिकारी आहेत जे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याजागी आता ते लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारतील. नरवणे यांची लष्करप्रमुख म्हणून २८ महिन्यांची मुदत ३० एप्रिलला समाप्त होत आहे.

एएनआयने ही बातमी देताना म्हटले होते की, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.

लेफ्ट. जनरल पांडे हे कॉर्प्स ऑफ इंजीनियर विभागात १९८२ मध्ये रुजू झाले होते. राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेत त्यांनी कॉर्प्स ऑफ इंजीनियर्समध्ये स्थान मिळविले.

जम्मू काश्मीरमध्ये एलओसीत पालनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रमदरम्यान त्यांनी इंजीनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते. आपल्या या कारकीर्दीत जन. पांडे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. इथियोपिया आणि एरिट्रिया येथील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत मुख्य इंजीनियरच्या रूपात ते सहभागी झाले होते. जून २०२० ते मे २०२१ या कालावधीत ते अंदमान निकोबारचे प्रमुख होते.

लष्करप्रमुख हे सर्वात प्रतिष्ठेचे पद भूषविण्यापूर्वी त्यांनी पूर्व लष्कराचे नेतृत्व केलेले आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश येथे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे ही वाचा:

PFI च्या नेत्यांना बंदीची धास्ती…

गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

‘वेडे समजता का? पाणीपुरवठा करण्यात काय अडचण?’

 

त्यांच्या या कारकीर्दीत परमविशिष्ठ सेवा पदक, अतिविशिष्ठ सेवा पदक, विशिष्ठ सेवा पदक अशा सन्मानाने गौरविण्यात आले आहे. आता मावळते लष्करप्रमुख नरवणे हे कदाचित सेनादलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून सूत्रे स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीचे सीडीएस बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर नरवणे यांच्याकडे ती जबाबदारी येईल. या पदावर ते पहिले मराठी व्यक्ती ठरू शकतील.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा