मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !

आरक्षणाच्या मागणीवर ठाम

मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारकाने अजूनही सरसकट अध्यादेश काढला नाही म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आरक्षणाच्या मागणी वर आम्ही असून सरकारने तातडीने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

लाडक्या योजनांवरुन सरकारच्या धोरणांवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, लाडकी बहिण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी योजना पण सरकार आणेल. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता. आम्ही तेवढा दिलेला आहे. आमचे सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत सगळे सोयरे आंमलबजावणी पाहिजे.

कोणाच्या काय हरकत येत काय कामाला माहित नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. २००४ चा कायदा आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. कारण कुणबी व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे रोटी बेटी व्यवसाय होतात. मराठा आणि कुणबी एकच आहे. या मागणीत बदल केलेला नाही. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

दिसली रायगडची पॉवर; अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’

मुस्लीमांना हव्या विधानसभेच्या ३२ जागा; ठाकरे-पवार मनावर घ्या…

उज्जैनमध्ये निवृत्त सैनिकाचा भाजप नेत्यावर गोळीबार !

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आहे. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे. अशा मागण्या जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारकडे केल्या आहेत.

Exit mobile version