मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या वादाचे परिमाण निवडणुकीवर पडणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, अखेर मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या माघारीवर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाचे आणि त्यांच्या वक्तव्याचे माझ्याकडून स्वागत. ‘देर आये दुरुस्त आये’, असे म्हणायला काही हरकत नाही आणि त्यांचे म्हणणे अगदी बरोबर असल्याचे मंत्री भुजबळ यांनी म्हटले.
राष्टवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री भुजबळ म्हणाले, एका समाजावर निवडणूक लढविली जात नाही. सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रात चांगले काम करू शकतात. पण त्यांनी निवडणूक लढवायचे जर ठरवले तर इतर समाज कदाचित साथ देत नाहीत. त्यामुळे मराठा समाज आता मोकळे पणाने मतदान करेल. २०-३० टक्के सोडले तर ६०-७० टक्के जे सर्व पक्षांचे उमेदवार आहेत, ते सर्व मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, असे मंत्री भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा :
मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार!
कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!
‘नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन’
धक्कादायक! १३ वर्षीय मुलाच्या पोटात आढळल्या काच, नट-बोल्ट, बॅटरीसारख्या ५६ वस्तू
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच एका जातीवर निवडणूक लढणे अशक्य असल्याचेही मनोज जरांगे म्हटले आहे. मनोज जरांगेंच्या या निर्णयाचं सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधकांनी स्वागत केले आहे.