मनोज जरांगे उपोषण सोडणार, समाजाने सांगितले की, आणखी काही कारण?

मराठा समाजाने उपोषण स्थगित करण्याची केली मागणी

मनोज जरांगे उपोषण सोडणार, समाजाने सांगितले की, आणखी काही कारण?

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषण सुरु केले होते. त्यांच्या उपोषणाचा बुधवारचा नववा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच त्यांनी पुन्हा एकदा उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. मराठा समाजाने उपोषण स्थगित करण्याची मागणी केल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. अखेर त्यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित झाल्याची घोषणा करताच ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा करण्यात आल्या. बुधवारी चार किंवा पाच वाजता उपोषण सोडणार असल्याचे मनोज जरांगेंनी जाहीर केले.

हे ही वाचा : 

पंतप्रधानांची फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने कट्टरपंथीयांकडून तिघांचे अपहरण करत मारहाण!

भारताची ‘पॉवर’; जपानला टाकले मागे

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील तुपाचीही होणार चाचणी!

भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये

“मी आता रुग्णालयात जाणार आाहे. मला १०- १२ दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. अंतरवलीला आलो की भेटू. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही,” असं जरांगे म्हणाले. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपण कुठल्याही नेत्याला घाबरायचं नाही हे लक्षात घ्या. आमच्या लेकरांशी, लेकींशी बेइमानी करु नका. एकाही नेत्याच्या सभेला, प्रचाराला जायचं नाही, असं मनोज जरांगेंनी मराठा समाजाला उद्देशून म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही हाताने सत्ता घालवू नका, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Exit mobile version