विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मुस्लिम, दलित साथ न मिळाल्याने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच एका जातीवर निवडणूक लढणे अशक्य असल्याचेही मनोज जरांगे म्हटले आहे.
राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार असल्याची चर्चा होती. मनोज जरांगे तशी बतावणी देखील करत होते. कालपासून ते १३- १४ जागांवर लढणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हे ही वाचा :
कॅनडात खलिस्तानींचा हिंदू मंदिरावर हल्ला, भाविकांना लाठीमार!
‘नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन’
धक्कादायक! १३ वर्षीय मुलाच्या पोटात आढळल्या काच, नट-बोल्ट, बॅटरीसारख्या ५६ वस्तू
भारताची न्यूझीलंडपुढे सपशेल शरणागती, कसोटी मालिकेत ०-३ हार
मनोज जरांगे म्हणाले, निवडणुकीसाठी आमची तयारी सुरु होती. संपूर्ण राज्यभर नाहीतर ठराविक जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार होतो, काल उमेदवारांच्या नावाची छाननी देखील सुरु होती. यासह मित्रपक्ष यांच्या यादीची प्रतीक्षा करत होतो. मात्र, मित्रपक्षांकडून केवळ १-२ अशी नावे आली होती. एवढ्यावर निवडणूक कशी लढवावी हा प्रश्न निर्माण झाला.
तसेच एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही, हे सर्वांनी सांगितले. माझीही तीच भूमिका होती. त्यामुळे निवडणूकीमधून माघार घेत आहे. मविआ, महायुती आणि अपक्षला आम्ही पाठींबा दिलेला नाही. माघार घेतली असली तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.