जरांगे यांचे उपोषण अस्त्र आता म्यान, समोरासमोर लढाई करणार!

मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत धडकणार

जरांगे यांचे उपोषण अस्त्र आता म्यान, समोरासमोर लढाई करणार!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज (३० जानेवारी) स्थगित केले. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासह त्यांनी सरकार पुढे आठ मागण्या केल्या. मात्र, मागण्या मान्य न केल्यास मुंबई जाम करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

२५ जानेवारी पासून सुरु केलेले उपोषण जरांगे यांनी स्थगित केले. ते सातव्यांदा उपोषणाला बसले होते. उपोषण स्थगित करण्यापूर्वी खासदार बजरंग सोनावणे आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची भेट घेत समजूत काढली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारला. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, पावणे दोन वर्षे मी सहन केले आहे. आज उपोषण स्थगित करत आहे. आता शक्यतो उपोषण होणार नाही समोरासमोर लढायचे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका शब्दांत उत्तर मागितले होते, पण त्यांनीकाही दिले नाही.

हे ही वाचा : 

प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!

ही ‘तोंड पाटील’की बंद कधी होणार ?

अक्षय कुमारकडून पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर, म्हणाला-‘सल्ला आवडला’

स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या मोमिकला घातल्या गोळ्या!

ते पुढे म्हणाले, मी आठ मागण्या केल्या आहेत. मराठ्यांच्या मागणीची अंमल बजावणी केली तर सरकारला सुखी राहू देणार अन्यथा नाही. मागण्यांची अंमल बजावणी नाहीतर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. आम्ही सगे-सोयरेंचा विषय सोडणार नाही. त्यावर आक्षेप असल्याने साध्य होत नाही पण २ ते ३ महिन्यात ते करा. आता केले नाही तर नंतर मुंबईला जाऊ. मी आंदोलन स्थगित करत आहे, संपवत नाही, असे जरांगे म्हणाले.

ही ‘तोंड पाटील’ की बंद कधी होणार ?  | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | MVA |

 

Exit mobile version