मराठा आरक्षणाचा वाद अजूनही मिटलेला नाही. मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांवरून मनोज जरांगे आणि मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात टीका-टिप्पणी सुरूच आहे. मनोज जरांगे यांची नुकतीच नाशिकमध्ये शांतात रॅली पार पडली. या शांतात रॅलीत मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. छगन भुजबळ ‘अपशकुनी’ असून ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे वाटोळे होते, असे मनोज जरांगे म्हणाले होते. मनोज जरांगे यांच्या टीकेवर मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या रॅलीत ५ लाख मराठा बांधव येणार असल्याचे काहींनी सांगितले. इतके लोक शहरात आले तर नाशिक बंद पडेल. पण प्रत्यक्षात ५ लाख नाहीतर ८ हजार लोकच रॅलीत सहभागी झाल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पोलिसांचा हा रिपोर्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्च्यात अनेक लोक शिव्या देत होते. काय त्यांची संस्कृती आणि घाणेरडे उच्चार. सुरवातीला मी शिव्या ऐकल्या त्यानंतर त्या बंद झाल्या. परंतु पुन्हा आता दोन महिन्यांपासून शिव्या द्यायला सुरवात झाली आहे.
ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे यांनी २५ वेळा उपोषण केले. पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्यानी जातीवाद करण्यास सुरुवात केली. परंतु त्याकडेही महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष दिले नाही.
हे ही वाचा :
चौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !
‘सरकारकडून कारवाई हवी, निषेध नको!’
आम आदमी पार्टीच्या हरभजनसिंग यांनी ममतांना विचारला तिखट सवाल
ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्याला टाकले कोठडीत