मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.याबाबत सोशल मीडियामार्फत अनेक पोस्ट व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हे आदेश काढले आहेत.आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास बंद ठेवण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.मराठा समाजाला आरक्षण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळेच मिळत नाहीये, तसे ते प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी रवाना झाले.त्यानंतर काल मुंबईत मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस ,अजित पवार यांनी स्पष्ट केले की, मराठा आरक्षणावरून जरांगे यांची भाषा राजकीय वाटत आहे.मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण हे पाहावे लागेल.तसेच जो कोणी कायदा हातात घेण्याचे काम करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
“आंदोलनस्थळी दगडफेक करण्याच्या सूचना जरांगेंकडूनचं”
रशिया-युक्रेन युद्धात सुरतच्या तरुणाचा मृत्यू
प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन
ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!
दरम्यान, सरकारच्या भूमिकेनंतर राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे.मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे.जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.तिर्थपुरी गावात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे.राज्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.