बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मनोज बाजपेयी यांच्या आईचे (वय ८०) प्रदीर्घ आजारानंतर दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने ही माहिती चाहत्यांशी शेअर केली.
मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी गेल्या २० दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅक्स पुष्पांजली रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. वाजपेयीशिवाय गीता देवी यांना आणखी दोन मुले आणि तीन मुली आहेत. मनोज बाजपेयी यांचे वडील आर.के. बाजपेयी यांचे आधीच निधन झाले आहे. ही बातमी कळताच मनोज वाजपेयीचे चाहते सोशल मीडियावर आईसाठी प्रार्थना करत आहेत. मनोज वाजपेयी यांच्या सासू शकीला रझा यांचेही निधन झाले आहे. त्यांच्या सासूला कॅन्सर झाला होता.
हे ही वाचा :
काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
मनोज बाजपेयी यांचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटाचे जोधपूर आणि मुंबईत याचे शूटिंग झाले आहे. झी स्टुडिओ आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेड प्रस्तुत, सुपर एस वर्माचा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित बंदा हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होऊ शकतो. बाजपेयी यांनी ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्येच काम केले आहे. तो वेब सीरिजच्या तिसऱ्या भागात असणार असून त्याची तयारी सुरू आहे. तो अभिषेक चौबेसोबत एक चित्रपट करत आहे, जो नेटफ्लिक्सवर येणार आहे.