मनोहर लाल खट्टर पंजाबचे राज्यपाल होण्याची शक्यता!

आमदारकीचा दिला राजीनामा

मनोहर लाल खट्टर पंजाबचे राज्यपाल होण्याची शक्यता!

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते.दरम्यान,अशी माहिती समोर आली आहे की, भाजप पक्ष त्यांना पंजाबचे नवे राज्यपाल बनवू शकते.

भाजपने जर ही खेळी केली तर पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा ताण वाढू शकतो, सध्या पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आहेत.पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरु आहे.आता जर मनोहर लाल खट्टर यांच्याकडे पंजाबच्या राज्यपालाची जबाबदारी आली तर ते चंदिगडसह हरियाणावर लक्ष ठेवू शकतील.

हे ही वाचा:

सीएएला राज्यांचा विरोध निरुपयोगी; प्रक्रियेचा राज्यांशी संबंध कमी !

अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर

पाकिस्तानचे झरदारी बिनपगारी!

काँग्रेसला रामराम करत पद्माकर वळवी यांचा भाजपात प्रवेश!

दरम्यान, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी २ फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात हे पद सोडण्याचे वैयक्तिक कारण दिले होते.मात्र, राज्यपालांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.अशा परिस्थितीत अशी अटकळ बांधली जात आहे की, पुरोहित यांचा राजीनामा न स्वीकारणे हा भाजपचा हरियाणामध्ये खळबळ माजवण्याचा एका गेमचा प्लॅन होता.

या संदर्भांत राज्यपाल पुरोहित यांनी आपला राजीनामा देणे हा पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे म्हटले होते.ते म्हणाले की, मला आपल्या पदावर थांबण्यास आणि काम करण्यास सांगितले होते.बनवारीलाल पुरोहित यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.दरम्यान, मनोहर लाल खट्टर यांनी सुमारे साडेनऊ वर्ष हरियाणाचे मुख्यमंत्री पद भूषविले अन मंगळवारी( १२ मार्च) आपल्या पदाचा राजीनामा दिला.मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने हरियाणात स्वबळावर सत्ता स्थापन करत नायबसिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Exit mobile version