पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, ३१ डिसेंबर रोजी म्हणजेच सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशाला संबोधित केले आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी २०२३ मधील भारताने मिळवलेल्या सर्व यशांबद्दल आणि भारताच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल भाष्य केलं. २२ जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना रामभजन नावाचा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचे आवाहन केले आहे. मंदिराचे उद्घाटन ऐतिहासिक होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करण्याचेही आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ भाषणाची सुरुवात फिट इंडिया या मुद्यावरून केली. यावेळी त्यांनी सांगितले की, शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. तसेच ते म्हणाले की, “भारत हा आत्मविश्वासाने भरलेला देश आहे, विकसित भारताचा स्वावलंबनाचा आत्मा आहे. आपल्याला २०२४ मध्येही तीच भावना आणि गती कायम ठेवायची आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त रामभजन मोहीम
२२ जानेवारीला अयोध्येत होणार्या प्रभू रामाचा अभिषेक ऐतिहासिक व्हावा यासाठी कविता, लेखन आणि इतर रचना लिहिण्यावर भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर २२ जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना रामभजन नावाचा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचे आवाहन केले. जेणेकरून मंदिराचे उद्घाटन ऐतिहासिक होऊ शकेल.
चांद्रयान-३ ची ऐतिहासिक कामगिरी
नरेंद्र मोदी म्हणाले, “आजही लोक मला चांद्रयान- ३ च्या यशाबद्दल अभिनंदन संदेश पाठवतात. मला खात्री आहे की, माझ्याप्रमाणे तुम्हालाही आपल्या शास्त्रज्ञांचा, विशेषत: आपल्या महिला वैज्ञानिकांचा अभिमान वाटेल.” 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला होता. ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
हे ही वाचा:
जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता
इम्रान खान निवडणूक लढण्यास अपात्र
‘सर्व निर्णय घेताना प्रथम असते फक्त राष्ट्रहित’!
३१ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सापडला जाळ्यात!
क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी
नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, “यावर्षी आपल्या खेळाडूंनीही खेळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या खेळाडूंनी आशियाई खेळांमध्ये १०७ पदके आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये १११ पदके जिंकली आहेत. तसेच भारतीय खेळाडूंनी क्रिकेट विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. आता २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन केले जाणार आहे, ज्यासाठी संपूर्ण देश खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.