कागदी विमाने बनवणारे तरुण अवकाशात रॉकेट पाठवत आहेत

मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा संवाद

जी मुले कागदी विमाने हाताने उडवत असत, त्यांना आता भारतातच विमान बनवण्याची संधी मिळत आहे. एकेकाळी चंद्र-तारे पाहून आकाशात आकार काढणाऱ्या मुलांना आता भारतातच रॉकेट बनवण्याची संधी मिळत आहे. खासगी क्षेत्र खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नेही साकार होत आहेत अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. ‘मन की बात’ च्या ९५ व्या भागात पंतप्रधानांनी देशातील जनतेशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी संवाद साधताना पुढे म्हणाले की , १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अवकाश क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने आपले पहिले असे रॉकेट अंतराळात पाठवले, ज्याची रचना आणि तयारी भारताच्या खाजगी क्षेत्राने केली होती. ‘विक्रम-एस’ असे या रॉकेटचे नाव आहे. स्वदेशी स्पेस स्टार्ट-अपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे .

पंतप्रधान म्हणाले की, ‘विक्रम-एस’ रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ‘विक्रम-एस’च्या प्रक्षेपण मोहिमेला दिलेले ‘प्ररंभ’ हे नाव अगदी चपखल बसते. हे भारतातील खाजगी अवकाश क्षेत्रासाठी एका नवीन युगाचा उदय दर्शवते. देशात आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे.

जेव्हा आपण तंत्रज्ञानाशी संबंधित नवकल्पनांबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण ड्रोनला कसे विसरू शकतो? भारत आता ड्रोनच्या क्षेत्रातही वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ड्रोनद्वारे सफरचंदांची वाहतूक कशी होते हे आपण पाहिले. आज आपले देशवासी आपल्या नवनवीन शोधांनी त्या गोष्टी शक्य करून दाखवत आहेत, ज्याची पूर्वी कल्पनाही केली जात नव्हती. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही? असेही पंतप्रधान म्हणाले.

हे ही वाचा :

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

जी २० अध्यक्षपद आपल्यासाठी एक संधी

जी २० चे अध्यक्षपद ही आमच्यासाठी संधी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. जगाच्या भल्याकडे लक्ष दिले पाहिजे. शांतता असो, एकता असो किंवा शाश्वत विकास असो, भारताकडे या गोष्टींशी संबंधित आव्हानांवर उपाय आहेत. आम्ही ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही थीम ठेवली आहे, यावरून वसुधैव कुटुंबकम्शी आमची बांधिलकी दिसून येते.  मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या स्थानाचे वेगळेपण जगासमोर आणाल असा आशावादही पंतप्रधांनी व्यक्त केला.

Exit mobile version