आज २८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात कार्यक्रमादरम्यान अनेक मुद्दे जनतेसमोर उपस्थित करून संवाद साधला. त्यातील संग्रहालयाच्या माध्यमातून देशाच्या इतिहासाचे जतन केले जात असल्याच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी भर दिला.
नरेंद्र मोदी यांनी संग्रहालयांचे महत्त्व विषद केले. हिरोशिमा दौऱ्यातील त्यांना आलेला अनुभव ते भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पोबद्दलही ते बोलले.
ते पुढे म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी जपानमधील हिरोशिमा येथे होतो. तिथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियमला भेट देण्याची संधी मिळाली. तो एक भावनिक अनुभव होता.जेव्हा आपण इतिहासाच्या आठवणी जपतो तेव्हा त्याचा येणाऱ्या पिढ्यांना खूप फायदा होतो. संग्रहालयात कधी नवे धडे मिळतात तर कधी खूप काही शिकायला मिळते.
तसेच काही दिवसांपूर्वी भारतात इंटरनॅशनल म्युझियम एक्स्पोचेही आयोजन करण्यात आले होते. यात जगातील १२०० हून अधिक संग्रहालयांची खासियत होती, ते पुढे म्हणाले. मोदींनी १४ एप्रिल २०२२ रोजी दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले होते. या संग्रहालयाचे पहिले तिकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेदी केले होते.आपल्याकडे भारतात अनेक प्रकारची संग्रहालये आहेत, जी आपल्या भूतकाळाशी संबंधित अनेक पैलू प्रदर्शित करतात.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांतही, आपण भारतात नवीन प्रकारची संग्रहालये आणि स्मारके बांधताना पाहिली आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील ‘आदिवासी बंधू-भगिनींच्या योगदानाला’ वाहिलेली दहा नवीन संग्रहालये उभारली जात आहेत. दिल्लीतील ”नॅशनल वॉर मेमोरियल” आणि ”पोलिस मेमोरियल” येथे शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दररोज अनेक लोक येतात.
हे ही वाचा:
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा
कोलकात्याच्या ‘व्हिक्टोरिया मेमोरिअलमधील बिप्लोबी भारत गॅलरी’ असो किंवा ‘जालियनवाला बाग’ स्मारकाचे पुनरुज्जीवन असो, देशातील सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असलेले ‘पीएम संग्रहालय’ आज दिल्लीच्या वैभवात भर घालत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच आपल्या देशातील जनतेला संग्रहालयाला भेट द्यायची असेल तर आता पहिल्यांदाच देशातील सर्व संग्रहालयांची आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली आहे.ते संग्रहालय कोणत्या थीमवर आधारित आहे, तेथे कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या आहेत, तेथील संपर्क तपशील काय आहेत. हे सर्व एका ऑनलाइन निर्देशिकेत समाविष्ट करण्यात आले आहे.
मोदींनी जनतेला विनंती करत म्हणाले की, जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या देशातील या संग्रहालयांना भेट द्यावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.लोकांना विविध संग्रहालयांना भेट देण्यास आणि तेथे काढलेले आकर्षक फोटो `#MuseumMemory` या हॅशटॅगसह शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
देशभरातील संग्रहालयांची यादी विस्तृत असून, भारतातील सर्व संग्रहालयांची सर्वसमावेशक माहिती प्रथमच संकलित करण्यात आली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी समारोप केला.या कार्यक्रमात अनेक मुद्दे उपस्तिथ केले, स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी बंधू-भगिनींच्या योगदानाला वाहिलेली दहा नवीन संग्रहालये देशात उभारली जात आहेत, असे मोदी म्हणाले. ४ जूनला संत कबीरदासजींची जयंती असल्याची आठवण करून देत मोदी म्हणाले, कबीरदासजींनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच समर्पक आहे. संत कबीरांनी समाजात फूट पाडणाऱ्या प्रत्येक वाईट प्रथेला विरोध केला, समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. जल संधारण बद्दल ही मोदींनी भाष्य केले ते म्हणाले,पाण्याशिवाय जीवनावर नेहमीच संकटे येतात, व्यक्ती आणि देशाचा विकासही ठप्प होतो.
जलसंधारणाच्या दिशेने हे मोठे पाऊल टाकले जात आहे. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेऊन आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती केली जात असल्याचे मोदी पुढे म्हणाले. याशिवाय २१ जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनाबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केली.