पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून यावर्षी प्रथमच देशवासियांना संबोधित केले.पंतप्रधान मोदींनी आज आपल्या भाषणाची सुरुवात राम मंदिराच्या उल्लेखाने केली.पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘२२ जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती पेटवून दिवाळी साजरी केली.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आपण सर्व देशवासीयांनी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. यावर्षी आपल्या राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च नायालयालाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
सर्वांच्या मुखात प्रभू राम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आजचा १०९ वा एपिसोड होता.प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने देशातील करोडो लोकांनां जोडले गेले.सगळ्यांच्या भावना सारख्याच, सर्वांची भक्ती सारखीच, सर्वांच्या मुखात फक्त राम… देशातील अनेकांनी राम भजने गायली.२२ जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती पेटवून दिवाळी साजरी केली.
२६ जानेवारीची परेड अप्रतिम
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी २६ जानेवारीची परेड खूपच अप्रतिम होती, परंतु सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे परेडमध्ये महिला शक्ती.केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांच्या महिला तुकडीने कर्तव्यपथावर परेड करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांचाच ऊर अभिमानाने भरून आला. या वेळी परेडमध्ये निघालेल्या २० पथकांपैकी ११ पथके केवळ महिलांची होती.
ते पुढे म्हणाले की, यावेळी १३ महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या मुलींनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवला. बदलत्या भारतात आपल्या मुली आणि देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत.डीआरडीओच्या चित्ररथानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जल, जमीन, आकाश, सायबर, आणि अवकाश अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती कशी देशाचे रक्षण करते हे यातून दिसून आले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘त्या’ वाजुखाना परिसरात शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी द्यावी
रोहन बोपण्णाने ग्रँडस्लॅमसह अनोख्या विक्रमाला घातली गवसणी
‘आयपीएस अधिकाऱ्या’ने केलेल्या कृतीमुळे त्याचे बिंग फुटले
हुती दहशतवाद्यांकडून मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्रहल्ला!
आरोग्य सेवांचा उल्लेख
पंतप्रधान म्हणाले की, यावेळी छत्तीसगडच्या हेमचंद मांझी यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे.वैद्यराज हेमचंद मांझी हे आयुष पद्धतीच्या मदतीने लोकांवर उपचार करतात.ते नारायणपूर, छत्तीसगडमध्ये ५ दशकांहून अधिक काळ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. तर श्री यानुंग या अरुणाचल प्रदेशाच्या रहिवासी असून त्या हर्बल औषधी तज्ञ आहेत.आपल्या देशात लपलेला आयुर्वेद आणि हर्बल औषधांचा खजिना जतन करण्यात सुश्री यानुंग आणि हेमचंद जी यांच्यासारख्या लोकांचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले.