पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ आयुर्वेदिक उद्योगाला मनोमन पटली आहे. देश-विदेशात लोकप्रिय झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अनेकदा आयुर्वेडच वेगवेगळ्या माध्यमातून उल्लेख केला होता. त्यामुळे लोकांचा आयुर्वेद क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला. जास्तीत जास्त लोकांनी आयुर्वेदाचा स्वीकार केल्यामुळे गेल्या नऊ वर्षात आयुर्वेद बाजारपेठेत पटीने वाढ झाली आहे.आयुष मंत्री सर्बानंद सोनेवाल यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली या लोकप्रिय मन की बातच्या ९९ भागांपैकी ३७ भागांमध्ये आयुर्वेदाचा उल्लेख केला आहे.
मन की बात मध्ये आयर्वेदाचे फायदे कळल्यानंतर आयुर्वेद बाजारपेठेत आठ पटीने वाढ होऊन ती २० हजार कोटी रुपायंवर गेली आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितलेल्या आयुर्वेदाच्या विविध क्षेत्रातील महत्वाच्या परिणामाचा तज्ज्ञांनी अभ्यास केला. हा अभ्यास अहवाल जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेद सायन्सेसच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. सोनेवाल यांच्या हस्ते या जर्नलचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या नऊ वर्षांमध्ये फक्त आयुष मंत्रालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आले नाही, तर नऊ वर्षांत त्याचे बजेट आठ पटीने वाढवण्यात आले. यासोबतच पंतप्रधानांनी त्यांच्या लोकप्रिय “मन की बात” च्या ९९ भागांपैकी ३७ भागांमध्ये आयुर्वेदाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आयुर्वेदाची लोकप्रियता देशातच नाही तर परदेशातही खूप वाढली आहे. आयुर्वेदिक औषधांवरील वाढत्या विश्वासावरून याचा अंदाज सहज लावता येतो.
हे ही वाचा:
भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट
महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला
निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल
महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला
देशात ५३ हजारांपेक्षा जास्त लहान आणि मध्यम उद्योग आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात कार्यरत आहेत. या क्षेत्रात९०० पेक्षा जास्त स्टार्टअप्सही उघडले आहेत. जवळपास ५२ देशांमध्ये आयुर्वेदिक औषधी अश्वगंधा निर्यात करणारा हैदराबादचा एक स्टार्टअप देखील युनिकॉर्न बनला आहे. या कंपनीचा व्यवसाय जवळपास ८००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या “मन की बात” कार्यक्रमात आयुर्वेदिक औषधे अत्याधुनिक पुराव्यावर आधारित मापदंडांशी सुसंगत असण्याची गरज वारंवार व्यक्त केली होती. त्यानुसार देशातील विविध विद्यापीठांमध्ये यासाठी अभ्यास सुरू करण्यात आला आणि विशेषत: कोरोनाच्या काळात गंभीर संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा परिणाम वैज्ञानिक निकषांवर सिद्ध झाला असे सर्बानंद सोनेवाल यांनी सांगितले.