25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषशूर सैनिकांसाठी 'मेरी माटी मेरा देश' मोहीम !

शूर सैनिकांसाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम !

मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० जुलै) त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १०३व्या आवृत्तीला संबोधित केले. यावर्षी ४,००० हून अधिक महिलांनी कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय किंवा ‘मेहरम’शिवाय ‘हज’ केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. जलसंवर्धन आणि वृक्षारोपण यावरही कार्यक्रमात चर्चा केली. तसेच पंतप्रधानांनी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली.

 

 

रविवार (३० जुलै) रोजी पंतप्रधान मोदींचा मासिक रेडिओ कार्यक्रमाचा १०३ व भाग प्रसारित झाला. मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १०३ व्या भागादरम्यान, पंतप्रधानांनी मान्सूनशी संबंधित घटनांबद्दल सांगितले आणि सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा करत जलसंवर्धन आणि वृक्षारोपण यावर चर्चा केली.तसेच यावर्षी ४,००० हून अधिक महिलांनी कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय किंवा ‘मेहरम’शिवाय ‘हज’ केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

 

 

“गेले काही दिवस नैसर्गिक आपत्तींमुळे चिंतेचे आणि संकटाने भरलेले आहेत. यमुनेसारख्या अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागला. डोंगराळ भागात भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत.मात्र, आपत्तीच्या काळात भारतातील लोकांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद पुन्हा समोर आणली आहे, असे ते म्हणाले.

 

 

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, हज यात्रा पूर्ण करून नुकत्याच परतलेल्या मुस्लिम महिलांची पत्रे मला मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत. हज धोरणातील बदलाचे कौतुक करताना ते म्हणाले की, यावर्षी ४,००० हून अधिक महिलांनी कोणत्याही पुरुष साथीदाराशिवाय किंवा ‘मेहरम’शिवाय ‘हज’ केले.त्यांची संख्या केवळ ५० किंवा १०० नाही तर ४,००० हून अधिक आहे. हा एक मोठा बदल आहे ,पूर्वी मुस्लिम महिलांना कोणत्याही ‘मेहरम’शिवाय ‘हज’ करण्याची परवानगी नव्हती. ‘मेहरम’शिवाय ‘हज’ करणार्‍या मुस्लिम महिलांसाठी महिला समन्वयकांची नियुक्ती केल्याबद्दल मी सौदी अरेबिया सरकारचे आभार मानू इच्छितो, पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

अयोध्या काशिनाथ भेट देणाऱ्या पर्यटकांची वाढलेली संख्या

 

पंतप्रधान म्हणाले की, “सध्या श्रावण पवित्र महिना सुरू आहे. श्रावण हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.  महादेवाच्या पूजेसोबतच ‘सावन’ हा हिरवाई आणि आनंदाशी निगडीत आहे. त्यामुळेच अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही हा सण खूप महत्त्वाचा आहे,” असं ते म्हणाले.यावेळी अनेक जण शिवाची पूजा करण्यासाठी यात्रा काढतात.दरवर्षी १० कोटीहून अधिक पर्यटक काशीला भेट देतात. “तुम्हाला हे जाणून आनंद होईल की बनारसला पोहोचणाऱ्या लोकांची संख्याही विक्रम मोडत आहे. आता दरवर्षी १० कोटीहून अधिक पर्यटक काशीला पोहोचत आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.मथुरा आयोध्या आणि उज्जैन मध्ये पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

हे ही वाचा:

बुलेट ट्रेनसाठी १२९.७१ हेक्टर वनजमीन मिळणार

उत्तर प्रदेशच्या मुलाचे भाग्य उजळले; २५ वर्षे मिळणार दरमहिना साडेपाच लाख

दगडूशेठ गणपती दर्शन, लोकमान्य टिळक पुरस्कार, मेट्रो उद्घाटन… उद्या पंतप्रधान पुण्यात

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही

 

तसेच हा पावसाचा हा टप्पा वृक्ष लागवड आणि जलसंवर्धनासाठी महत्त्वाचा आहे आणि भारतातील लोक संपूर्ण जागरूकता आणि जबाबदारीने ‘जलसंवर्धन’साठी अभिनव प्रयत्न करत असल्याचे मोदींनी सांगितले.मात्र, यावेळी त्यांनी जलसंधारणाचे अधिक महत्त्व असल्याचे सांगितले ते म्हणाले,”‘आझादी का अमृत महोत्सव’ दरम्यान बांधलेले ६०,००० हून अधिक अमृत सरोवर त्यांची चमक वाढवत आहेत.५०,००० हून अधिक अमृत सरोवर बांधण्याचे कामही सुरू आहे. आपल्या देशातील लोक जलसंवर्धनासाठी नवनवीन प्रयत्न करत आहेत.पकारिया गावाचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले, “पकारिया गावातील आदिवासी बंधू-भगिनींनी प्रशासनाच्या मदतीने सुमारे शंभर विहिरींचे जलपुनर्भरण यंत्रणेत रूपांतर केले आहे. पावसाचे पाणी आता या विहिरींमध्ये वाहते, आणि विहिरींमधून, पाणी जमिनीत शिरते.”

 

पंतप्रधानांनी ‘मेरी माती मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली

 

देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘मेरी माती मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ ‘मेरी माती मेरा देश’ ही एक मोठी मोहीम देशात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान माती आणि झाडे घेऊन ‘अमृती कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे. गावागावांतून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलश दिल्लीला पोहोचतील. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळील या कलशांमध्ये माती आणि वनस्पतींपासून ‘अमृत वाटिका’ बनवली जाईल,” असे ते म्हणाले.

 

 

पीएम मोदी म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ आहे. अमेरिकेने आपल्याला शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केले आहेत. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली आणि ही कलाकृती अडीच हजार वर्षांहून जुने असल्याचे त्यांनी सांगितले.ही कलाकृती टेराकोटा, दगड आणि धातूवर बनवले जातात. याशिवाय व्यसनमुक्ती वर पंतप्रधान मोदी म्हणाले की भावी पिढ्यांना वाचवण्यासाठी २०२० मध्ये व्यसनमुक्ती मोहीम सुरू करण्यात आली. भारताने ड्रग्जच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे.भारताने १० लाख किलो ड्रग्ज नष्ट करण्याचा अनोखा विक्रमही केला आहे.नष्ट केलेल्या ड्रग्जची किंमत बारा हजार कोटी रुपये पेक्षा जास्त असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

 

१५ ऑगस्ट अवघ्या काही दिवसांवर असताना, पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले आणि ‘हर घर तिरंगा’ परंपरा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी प्रत्येक घरात तिरंगा फडकावावा लागेल आणि ही परंपरा पुढे चालवावी लागेल. यावरून आपल्या देशासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव होईल, ते पुढे म्हणाले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा