मोदी म्हणाले, नवीन वर्षात आनंदी रहा पण सतर्कही रहा

'मन की बातमध्ये पंतप्रधानांचे मास्क, सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला

मोदी म्हणाले, नवीन वर्षात आनंदी रहा पण सतर्कही रहा

मावळते वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात सांगितली. या वर्षातील ‘मन की बात’ च्या ९६ व्या आणि या वर्षातील शेवटच्या पुष्पमालिकेतून त्यानं जनतेशी संवाद साधला. जगासह भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना चा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आशा वातावरणातच पंतप्रधानांनी जनतेला महत्वाचा सल्ला दिला आहे. नवीन वर्षांचा खूप आनंद घ्या पण सतर्क रहा असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

चीनमध्ये कोरोनामुळे दररोज हजारो मृत्यू होत आहेत. पीएम मोदींनी लोकांना साथीच्या आजारापासून वाचण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधान म्हणाले की जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वाढत असल्याचे तुम्हीही पाहत आहात म्हणूनच मास्क आणि हात धुणे या सारख्या जबाबदारीची अधिक काळजी घेतली पाहिजे आपण सावध राहिलो तर आपणही सुरक्षित राहू आणि आपल्याला आनंदात कोणताही अडथळा येणार नाही.

उद्या २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस आहे. दिल्लीत साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याला समर्पित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही संधी मी घेईन. साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान देश सदैव स्मरणात ठेवेल असेही पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

२०२५पर्यंत भारत टीबीमुक्त झाला पाहिजे.
पीएम मोदी म्हणाले की, आम्ही भारतातून स्मॉलपॉक्स , पोलिओ यांसारखे आजार नष्ट केले आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळाआजार नावाचा हा आजार आता झपाट्याने संपत आहे. या भावनेने आपण भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त केले पाहिजे असे आवाहन मोदी यांनी केले यापूर्वी जेव्हा टीबीमुक्त भारत मोहीम सुरू झाली तेव्हा हजारो लोक रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले हे तुम्ही पाहिलेच असेल याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

Exit mobile version