केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.‘मी संसदेत याविषयी आधीच बोललो आहे. संघर्ष सोडवण्यासाठी आम्ही आमची सर्वोत्तम संसाधने आणि प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. भारत सरकारने वेळीच केलेला हस्तक्षेप आणि मणिपूर सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे राज्याच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी ‘आसाम ट्रिब्यून’ वृत्तपत्राला सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की संघर्ष टिपेला पोहोचला असताना गृहमंत्री अमित शाह मणिपूरमध्येच राहिले आणि त्यांनी हा संघर्ष सोडवण्यासाठी विविध घटकांसोबत १५हून अधिक बैठका घेतल्या. राज्य सरकारतर्फे मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्याच्या मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये आर्थिक पॅकेजही दिले गेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
हे ही वाचा:
एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!
‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’
हिंदू नववर्षाचा राज्यात उत्साह! शोभा यात्रांचे आयोजन
काँग्रेस म्हणजे कडू कारले, साखरेत घोळले तरी कडूच!
मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधानांवर अनेकदा हल्ला चढवला आहे आणि गेल्या वर्षी मे महिन्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यापासून राज्यात निर्माण जालेल्या तणावपूर्ण परिस्थितीसाठी त्यांच्या सरकारला जबाबदार धरले आहे.
गेल्या वर्षी, मणिपूरमधील परिस्थितीवर पंतप्रधानांनी निवेदन करण्याची मागणी करत विरोधकांनी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. तेव्हा ‘संपूर्ण देश मणिपूरच्या पाठीशी आहे आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे एकत्र काम करत आहेत,’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी संसदेत मणिपूरबद्दल भाष्य केले होते.