मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. ४०० लोकांच्या सशस्त्र जमावाने चुराचांदपूर एसपी-डीसी कार्यालयांना घेराव घातला. या जमावाने सरकारी वाहने पेटवून दिली. सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. एका पोलिस कॉन्स्टेबलला हटवल्याने हा हिंसाचार झाल्याचे समजते. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून ३०हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिस आणि लष्कराने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

३०० ते ४०० जणांच्या जमावाने पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयावर दगडफेक केली. मात्र जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
एका व्हिडीओत पोलिस हेडकॉन्स्टेबल सियामलालपॉप हा सशस्त्र जमाव आणि गावातील स्वयंसेवकांसोबत बसलेला दिसत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक शिवानंद सुर्वे यांनी या हेडकॉन्स्टेबलला निलंबित केले. अनुशासित पोलिस दलाचा सदस्य असल्याने हा गंभीर आरोप असल्याचे पोलिसांनी नमूद केले होते.

हे ही वाचा:

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’

मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल स्वीकारला

आता चुराचांदपूर पोलिस या हेड कॉन्स्टेबलची विभागीय चौकशी करेल. इंडिजनस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ)ने या घटनेला पोलिस अधीक्षक शिवानंद सुर्वे यांना जबाबदार ठरवले आहे. ते जर निष्पक्षपणे काम करत नसतील तर त्यांना कुठल्याच आदिवासी क्षेत्रात राहण्याची परवानगी देता येणार नाही. पोलिस अधीक्षकांनी हेडकॉन्स्टेबलचे निलंबन तातडीने रद्द करावे, अशी मागणी फोरमने केली आहे. तसेच, पोलिस अधीक्षकांनी २४ तासांच्या आत जिल्हा सोडावा, अन्यथा भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास यासाठी पोलिस अधीक्षक जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version