काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात करणार आहेत. भारत जोडो यात्रेचे ‘भारत न्याय यात्रा’ असे नामकरण करण्यात आले असून १४ जानेवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. या पदयात्रेचा प्रवास ‘मणिपूर ते मुंबई’ असा असणार आहे. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ट्विट करत या न्याय यात्रेची खिल्ली उडविली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत न्याय पदयात्रेत १४ राज्यांमधील ८५ जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात ६,२०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यावर आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी…. हास्य जत्रेचा नवा हंगाम सुरू करणारेत म्हणे….
राहुल गांधी…. हास्य जत्रेचा
नवा हंगाम सुरू करणारेत म्हणे….
😀😀😀— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2023
हे ही वाचा:
महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !
जय श्रीराम: उत्तराखंडमधून १५०० रामभक्त येणार अयोध्येत!
आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!
कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!
काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे हे या यात्रेला १४ जानेवारीला मणिपूरमधून हिरवा झेंडा दाखवतील.लोकांना जास्तीत जास्त प्रवेश मिळावा या उद्देशाने बसेसची सेवा करण्यात आलेली आहे.काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.या पूर्वीच्या भारत जोडो यात्रेने ४,५०० किलोमीटरचा प्रवास केला होता.ही भारत जोडो यात्रा दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू होऊन उत्तरेकडील काश्मीरमध्ये थांबली होती, असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.