मणिपूर अशांत; निदर्शने सुरूच, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाच दिवस इंटरनेट बंद !

तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू 

मणिपूर अशांत; निदर्शने सुरूच, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाच दिवस इंटरनेट बंद !

मणिपुरमध्ये हिंसाचार आणि निषेधाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पाच दिवस म्हणजे १५ सप्टेंबर पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे. मणिपुरमध्ये शांतात प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने निदर्शने सुरु आहेत. आज इम्फाळमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

आंदोलक मणिपूर सरकारच्या डीजीपी आणि सुरक्षा सल्लागारांना हटवण्याची मागणी करत आहेत. डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास असमर्थ असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आंदोलकांनी राजभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलाकांकडून अडवण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. BNSS च्या कलम १६३ (२ ) अंतर्गत थौबलमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात इंटरनेट बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!

१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात ‘सोशल मीडियाबंदी’

अमेरिकेत चीनची भांडी घासतायत राहुल गांधी…

उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !

इम्फाळ पूर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १० सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात पूर्वी दिलेली कर्फ्यू शिथिलता रद्द केली आणि सकाळी ११ पासून संपूर्ण कर्फ्यू लागू केला. आरोग्यसेवा , वीज, महापालिका कर्मचारी, मीडिया कर्मचारी आणि न्यायालयीन कामकाजासह अत्यावश्यक सेवांना कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे.

https://youtu.be/DTop4xaQ-K8?si=3QQwHSvLGMDO9Gi7
Exit mobile version