मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

सरकारचे लोकांना आवाहन

मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, सगळीकडे प्रचार सभा, निवडणुकीच्या घोषणा, आश्वासने आणि नेत्यांच्या वक्तव्यांचा आवाज घुमत आहे. असे असूनही, ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात हिंसाचार अद्याप पूर्णपणे शांत झालेला नाही.दरम्यान, राज्यात निवडणुकीच्या चर्चा आणि रॅलीशी संबंधित पोस्टर्स, बॅनर आणि वस्तू गायब आहेत, परंतु येथे अनेक ठिकाणी बंदुकांचे चित्र असलेले ‘ड्रॉप बॉक्स’ दिसत आहेत. प्रत्यक्षात राज्यात अनेक ठिकाणी शस्त्रांचे ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आले आहेत. या ड्रॉप बॉक्सद्वारे प्रशासन आणि सरकारने हिंसाचाराच्या वेळी लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु होता तेव्हा लोकांनी सैनिकांकडून सरकारी शस्त्रे लुटली होती. यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत लोकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे परत केली आहेत, परंतु सैनिकांकडून लुटलेली ४,२०० हुन अधिक शस्त्रे अद्याप गायब आहेत.अशा परिस्थितीत निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये म्हणून लुटलेली शस्त्रे ड्रॉप बॉक्समध्ये ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!

टी-२०त ‘हिटमॅन’ने ठोकला ५०० वा षटकार!

राज्यात अनेक ठिकाणी ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आले आहेत.या ड्रॉप बॉक्सवर इंग्रजी आणि मैतेई भाषेमध्ये लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.’हिसकावून घेतलेली तुम्ही शस्त्रे कृपया करून येथे टाका’, असा मजकूर ड्रॉप बॉक्सवर लिहिण्यात आला आहे.अनेक ड्रॉप बॉक्समध्ये शस्त्रे सरेंडर करण्यात आली आहेत, मात्र अनेक बॉक्स रिकामेही दिसून आले आहेत.दरम्यान, मणिपूरमध्ये लोकसभेच्या २ जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला अंतर्गत मणिपूर आणि बाह्य मणिपूरच्या काही भागात मतदान होणार आहे. तर बाह्य मणिपूरच्या उर्वरित भागात २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Exit mobile version