मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी सांगितले की, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) या मणिपूरमधील बंडखोर गटाने केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे.

शांतता कराराची घोषणा करताना, अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, “मणिपूरच्या खोऱ्यातील सर्वात जुने सशस्त्र गट यूएनएलएफगटाने हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवासात त्यांना शुभेच्छा देतो. शांतता आणि प्रगतीचा मार्ग.”शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर यूएनएलएफ कार्यकर्त्यांनी शस्त्रे समर्पण केल्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला.

३ मे रोजी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर यूएनएलएफगटाकडून शांततेसाठी सरकारशी वाटाघाटी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात लग्न करून बनलेली फातिमा पुन्हा भारतात अंजु बनून परतली!

बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी देवदूत बनलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० हजारांचा भत्ता

मुंबई पोलिसांच्या ‘लिओ’ श्वानाने अपहरण झालेल्या मुलाला काढले शोधून!

अजानसाठी लाऊडस्पीकर वापरल्याने ध्वनी प्रदूषण होत नाही, गुजरात उच्च न्यायालय!

१३ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यूएपीए कायदा अंतर्गत आठ मीतेई अतिरेकी संघटनांवर बंदी वाढवण्यात आली आणि त्यांना बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले.बंदी घालण्यात आलेल्या आठ संघटनांमध्ये यूएनएलएफचाही समावेश होता.

तथापि, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी २६ नोव्हेंबर रोजी घोषणा केली होती की, राज्य सरकार यूएनएलएफ सोबत शांततेच्या करारावर स्वाक्षरी करण्याच्या मार्गावर आहे.

Exit mobile version