मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांदरम्यान किमान पाच लोक ठार झाले होते. या हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाकडून एक मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये स्नायपर रायफल, पिस्तूल, बंदुका, लहान आणि लांब पल्ल्याच्या मोर्टार, ग्रेनेड आणि लांब पल्ल्याच्या रॉकेट बॉम्बसह इतर दारुगोळ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी सुरु झालेल्या वांशिक हिंसाचारात अनेकांनी जीव गमावले आहेत. अजूनही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीते. शनिवारी (७ सप्टेंबर) जिरीबाम जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सत्ताधारी आघाडीच्या आमदारांसोबत तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल एल आचार्य यांची भेट घेतली.
हे ही वाचा :
बांगलादेशी घुसखोर बेंगळुरूत घुसणार होते; पण त्रिपुरातच अटक !
महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !
भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !
शनिवारी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, गुप्तचर विभागाचे पोलीस महानिरीक्षक के कबीब यांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे.
लष्कराने कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले असून शनिवारी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले. एकूण नऊ अत्याधुनिक शस्त्रे, २१ विविध प्रकारचा दारूगोळा, २१ स्फोटके, ग्रेनेड आणि एक वायरलेस सेट जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.