मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला!

एक सुरक्षा कर्मचारी जखमी

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला!

मणिपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला आहे.सोमवारी( १० जुना) सकाळी १०.३० च्या सुमारास कांगपोकपी जिल्ह्यात ताफ्यावर सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी सांगितले की, सीएम एन बिरेन सिंह यांचा सुरक्षा ताफा मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात जात होता, मात्र त्यादरम्यान अचानक अनेक राऊंड फायर करण्यात आले. सुरक्षा दलानेही प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला आहे.पीटीआयशी बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांचा हल्ला झाला तेव्हा ताफ्यामध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंग न्हवते.मुख्यमंत्री बिरेन सिंग अद्याप दिल्लीहून मणिपूरमधील इम्फाळला पोहोचलेले नाहीत.जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते जिरीबाम येथे जाण्याची योजना आखात होते.

हे ही वाचा:

बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर होणार पोटनिवडणुका!

गिरीश चंद्र मुर्मू बनू शकतात ओडिशाचे नवे मुख्यमंत्री!

पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!

मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न

दरम्यान, मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात परिस्थिती तणावपूर्ण आहे.८ जून रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला आहे.सोइबाम सरतकुमार सिंग नावाचा व्यक्ती ६ जून रोजी त्याच्या शेतात गेल्यानंतर बेपत्ता झाला होता.यानंतर त्याचा मृतदेह सापडला, परंतु त्याच्या शरीरावर धार-धार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.यानंतर परिसरात हिंसाचाराला सुरुवात झाली.या व्यक्तीच्या हत्येमुळे काही सरकारी कार्यालयांसह सुमारे ७० घरे जाळण्यात आली आणि शेकडो नागरिकांनी भागातून पळ काढला.दरम्यान, या हिंसाचारग्रस्त भागाला मुख्यमंत्री भेट देण्याची योजना आखत होते.

 

Exit mobile version