मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून याची गंभीर दखल आता केंद्र सरकारने घेतली आहे. मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिसंक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सलग दुसऱ्या दिवशी चर्चा झाली. या प्रदेशात तणाव कायम असल्याने गृह मंत्रालयाने मणिपूरमध्ये सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीदरम्यान, गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील सुरक्षा तैनातीचा आढावा घेतला, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि राज्य पोलिस अधिकाऱ्यांना प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, गृह मंत्रालायाने मणिपूरसाठी मोठा निर्णय घेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या राज्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २० तुकड्या तैनात केल्या होत्या. यामुळे ,मणिपूरमध्ये एकूण ७० केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या तुकड्या कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी तैनात असणार आहेत.
हे ही वाचा :
औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!
दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!
मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!
ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!
मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या सहा जणांचे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यात सापडले यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला. निदर्शनांनंतर, हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्वमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आणि सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. रविवारी मणिपूरमध्ये निदर्शने आणि हिंसाचार वाढला, परिणामी सुरक्षा दलांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोळीबार केल्यानंतर जिरीबाम जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वाढत्या तणावादरम्यान, जमावाने त्या भागातील भाजपा आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयाची तोडफोड करत कार्यालये पेटवून दिली. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मणिपूरमधील अलीकडील हिंसाचाराशी संबंधित तीन प्रकरणांची चौकशी हाती घेतली आहे.