इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यातील प्रत्येक ओळ ही देशाला आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर बनवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. होशंगाबाद येथे जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी एका झटक्यात देशातून गरिबी हटवण्याचे आश्वासन देणाऱ्या ‘शहजादा’ राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.

राहुल गांधींचा “काँग्रेस के शहजादे”असा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्यावेळी त्यांनी एका झटक्यात गरिबी हटवण्याची घोषणा केली तेव्हा संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला.हा “शाही जादुगर” इतकी वर्षे कुठे लपला होता, हेही देश विचारत आहे.गेल्या आठवड्यात राजस्थानमधील एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी म्हणाले की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस जिंकल्यास, “गरिबी एकाच झटक्यात नष्ट होईल”, या त्यांच्या विधानाचा आज पंतप्रधान मोदी यांनी चागलाच समाचार घेतला.जर तुम्ही दारिद्र्यरेषेखाली असाल, तर दरवर्षी १ लाख रुपये खटखटखट येतील, असेही राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब घरातील महिलांना वर्षाला १ लाख रुपये मिळतील याची खातरजमा पक्ष करेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा..

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

अवघ्या ५० रुपयांसाठी ग्राहकाने दुकानदाराच्या बोटाचा घेतला चावा!

इराणने इस्रायलवर सोडलेली शकडो ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निकामी

भारतीय लष्करी जवानांची दुसरी तुकडी मालदीवमधून परतली!

याचा समाचार घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले, एका कुटुंबाने स्वातंत्र्यानंतर अनेक दशके “रिमोट कंट्रोलद्वारे” सरकार चालवले.या कुटुंबाने देशात आणीबाणी लादली.ते पत्त्याच्या घराप्रमाणे देशभरातील लोकशाही सरकारे पाडायचे. २०१४ च्या आधी त्यांनी १० वर्षे रिमोट च्या माध्यमातून सरकार चालवले आणि त्यांना ‘झटके वाला’ मंत्र मिळाला असे म्हणत आहेत. हा मंत्र कुठून आला? मला सांगा, ही गरिबांची चेष्टा नाही का? गरिबांचा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी केला.

विरोधी पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांबाबत पंतप्रधान म्हणाले की, इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यात अनेक धोकादायक अशी आश्वासने आहेत. त्यांचा जाहीरनामा देशाला आर्थिक दिवाळखोर बनवण्याचा आहे. कॉंग्रेसचा शाही परिवार मोदी जर तिसऱ्यादा पंतप्रधान झाले तर देश पेटून उठेल अशी धमकी देत आहेत. आग देशात नाही पण आग आणि मत्सर त्यांच्या हृदयात आहे. ही ईर्षा इतकी तीव्र आहे की ती आतून जळत आहे. ही ईर्षा १४० कोटी देशवासीयांच्या मोदींवरील प्रेमामुळे आहे, असेही ते म्हणाले.

Exit mobile version