कोकणात ‘कांदळवन पर्यटन गाव’ ही संकल्पना

कोकण किनारपट्टीचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी आखण्यात आलेली योजना.

कोकणात ‘कांदळवन पर्यटन गाव’ ही संकल्पना

कोकणातील सागरी अस्तित्त्व टिकून राहण्यासाठी कोकण किनारपट्टी भागातील समृद्ध कांदळवनांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘कांदळवन पर्यटन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ‘कांदळवन प्रतिष्ठान मुंबई व कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्या मार्फत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तसेच ‘कांदळवन पर्यटना’ला गती देण्यासाठी ‘कांदळवन पर्यटन गाव’ हा उपक्रम ही राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना रत्नागिरी येथे राबविण्यात येणार आहे.

ही योजना कक्षाच्या माध्यमातून सोनगाव येथे मगर म्हणजेच क्रोक्रोरोडाईल सफारी, तसेच आंजर्ले येथे निसर्ग पर्यटन योजना राबवण्यात आली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातिल पावस गावाची निवड सुद्धा ‘कांदळवन पर्यटन गाव’ म्हणून आली आहे. तसेच कोकणातील पर्यटनाला उभारी देण्यासाठी आणि पर्यटनातून उद्योग निर्मितीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच निसर्गप्रेमी आणि अभ्यासप्रेमी पर्यटकांसाठी खास ही सुसज्ज अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या अभ्यासातून कांदळवनाच्या विविध प्रजातीची माहिती ही दिली जाणार आहे. आणि किनारपट्टी लगत येणाऱ्या कांदळवनांचे कोणतेही नुकसान न करता ही संकल्पना राबवली जाणार आहे.

हे ही वाचा:

रियाज भाटीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

आठ राज्यांमध्ये NIA कडून PFI वर कारवाई

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व

नवरात्र २०२२: करवीर आणि महालक्ष्मीची गाथा

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावाची कांदळवन पर्यटन म्हणून निवड करण्यात आली आहे. पावस गावातून वाहणाऱ्या गौतमी नदी ही ‘रनपार खाडी’ला जावून मिळते. याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात खाडीच्या किनाऱ्या लगत कांदळवन क्षेत्र असून या ठिकाणी पांढरी चिपी, कांदळ, तिवार, काटेरी, हुरी, किरकिरी, सुगंधासह तब्बल नऊ प्रकारच्या कांदळवन प्रजाती आढळल्या आहेत. तसेच इथे २० प्रकारचे पक्षी आणि कोल्हा व घोरपड सारखे प्राणी, खाडीमध्ये विविध प्रजातीचे प्राणी आढळून आले आहेत. मुळात पावस हे धार्मिक क्षेत्र स्वामी स्वरूपानंदाची पावणभूमी म्हणून ही ओळखले जात असून, जगाच्या नकाशावर पावस हे आढळून येते. या उपक्रमाचा फायदा तिथल्या स्थानिक छोट्यामोठ्या व्यवसायिकांनाही याचा लाभ होणार आहे.

Exit mobile version