भारतरत्न लता मंगेशकर यांची रविवारी ६ फेब्रुवारी रोजी ९२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. दरम्यान मुंबई विद्यापीठाने लता मंगेशकर यांच्या नावाने प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्रांची स्थापना केली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावर मंगेशकर कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहले आहे.
मुंबई विद्यापीठाने लतादीदींच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कुलगुरुंनी हा निर्णय परस्पर घेतल्याने मंगेशकर कुटुंबीयांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंगेशकर कुटुंबियांनी कुलगुरू सुहास पेडणकरांच्या कारभारावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. मंगेशकर कुटुंबियांना विश्वासात न घेता निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी या पत्रात लिहले आहे.
हे ही वाचा:
बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स
कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
राज्य सरकारने मास्टर दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंगेशकर कुटुंबातील सदस्य आणि संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. मात्र विद्यापीठाच्या समितीने सुचवलेली जागा लतादीदींच्या हयातीत उपलब्ध करून न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नससल्याचा खेद वाटत असल्याचे कुटुंबियांनी पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.