कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढ़ा यांच्या हस्ते कांदिवली पूर्वमध्ये महिलांसाठी फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये स्नानगृहांचा आभाव असल्याने महिलांना निशुल्क स्नानगृह आणि कपडे धुण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने या फिरत्या स्नानगृहाची संकल्पना मांडण्यात आली होती. देशात प्रथमच अशाप्रकारच्या स्नानगृहाच्या उपक्रम राबविण्यात आला आहे.
दरम्यान मीडियाशी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “मुंबईतील झोपडपट्यांच्या विकासापूर्वी महिलांसाठी स्नानगृहाचा अभाव ही एक अडचण आहे, त्यामुळे आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेनुसार या स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. एक वर्षांपूर्वी कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मला सुचवलं होतं कि पालकमंत्री म्हणून फिरते जिम आणि शौचालय दिलं आहे त्याप्रमाणेच फिरत्या स्नानगृहाचीही गरज आहे. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येऊन याचे नियोजन केले. महानगरपालिकेने पुढाकार घेऊन याची निर्मिती करुन घेतली.”
या फिरत्या स्नानगृहात पाच प्रशस्त अशा स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांसाठी निशुल्क वॉशिंग मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत. आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी स्मार्ट नॉब सिस्टम करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने या फिरत्या स्नानगृहात एक महिला कंडक्टरही ठेवण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
दिल्ली निवडणुकीत तृणमूलचा आपला पाठिंबा, केजरीवाल म्हणाले ‘धन्यवाद दीदी’
१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवादी शरण!