महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) पर्यटन धोरणाच्या माध्यमातून ‘आई’ या नावाने एक उपक्रम राबविला जाणार आहे. विभाग अधिकारी लवकरच आपल्या ‘महिला पर्यटन’ धोरणाअंतर्गत ब्रँड एम्बसीडर नेमणार आहेत. सवलतींमध्ये सहलींचा समावेश असेल आणि राज्यभरातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स बरोबर करार केलं जाणार आहे. हे सर्व महिलांना अनुकूल मुक्कामाची ऑफर देतील.
राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, पर्यटन विभाग पर्यटन क्षेत्रातील शीर्ष महिला उद्योजकांच्या संपर्कात आहे. भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर लवकरच तपशीलवार हे धोरण तयार केलं जाणार आहे. सरकारतर्फे महिला पर्यटकांना सवलत किंवा सबसिडी देण्याचाही विचार असल्याचे लोढा म्हणाले.
तसेच ‘आई’ हा उपक्रम केवळ महिलांसाठी समर्पित असेल व एमटीडीसीच्या विविध पर्यटन सर्किट्ससह खास मुंबई दर्शनचे प्रबंध केले जातील. शहराच्या विविध प्रमुख पर्यटन स्थळांचे प्रदर्शनही थाटात केलं जाईल. सध्या पर्यटन विभाग नवीन पर्यटन उपक्रमांद्वारे एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा विचार करत आहे, असंही लोढा म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!
चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही
वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३
पुढे ते म्हणाले, महिला पर्यटन सर्किटमध्येही महिलांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल. आम्ही वर्षातून एकदा ‘आई’ पर्यटन महोत्सवाचे आयोजन करू. या फेस्टिव्हलसाठी सेलिब्रिटी आणि उद्योजकांसह विविध क्षेत्रातील महिलांना आमंत्रित करण्यात येईल. संपूर्ण ‘आई’ पर्यटन उमक्रमातून महिलांना अनुकूल पर्यटन वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, मार्केटिंग, वाहतूक, प्रवास आणि पर्यटक मार्गदर्शक यांसारख्या पर्यटनाशी संबंधित सर्व व्यवसायांमध्ये महिलांची उपस्थिती आणि सहभाग वाढवायचा आहे. आम्ही पर्यटन विभागामध्ये एक पर्यटन युनिट स्थापन करू, असं मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी नमूद केलं आहे.