आंध्रप्रदेशमधील मंदिरांवर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे आंध्रमधील हिंदू समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी “अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत. असे सांगितले आहे.
आंध्रप्रदेशमधील राजामुंद्री येथील विघ्नेश्वर मंदिरातील भगवान सुब्रमण्यम यांच्या मुर्तीची विटंबना झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर विशाखापट्टणम परिसरात असलेल्या श्री. कोमलम्मा पादलालु मंदिरातील मूर्तीही भग्न अवस्थेत सापडल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या निंदनीय घटना घडल्या आहेत. या घटनेची दखल घेत पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरच्या आणि १ जानेवारीच्या रात्री हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
याअगोदर विझियानगरम जिल्ह्यातील रामतीर्थं मंदिरातील ४०० वर्ष जुन्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची सुद्धा विटंबना करण्यात आली होती. तर सिता लक्ष्मण मंदिरातील मूर्तीचे डोके धडापासून वेगळे करुन जवळच्या तलावात टाकण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या विविध ५ टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.
भाजपाने या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत ‘चलो रामतीर्थं’ असे आंदोलन सुरु केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत आंध्र प्रदेश सरकारवर सडकून टीका केली आहे. “हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत बघू नका” असं ट्विट करत देवधर यांनी आंध्रप्रदेश सरकारला खडसावले आहे. आंध्रप्रदेश सरकार एका विशिष्ट धर्माप्रती प्रेम दाखवत आहे, मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी देवधर यांनी केली आहे.
Every attack on Temples in AP is testing Hindus’ patience. @ysjagan’s govt. is failing in arresting culprits while tacitly showing love for a particular religion.
Tomorrow, @BJP4Andhra is conducting #ChaloRamateertham program against govt.’s inaction wrt Vizianagaram incident. pic.twitter.com/QrUnr56qMB— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) December 31, 2020