बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील घटना

बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला पोलीस, परंतु अधिकाऱ्याला मारलेल्या सॅल्यूटने केला घात!

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या बहिणीला बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्यासाठी पोलिसाचा गणवेश परिधान करून परीक्षा केंद्रावर पोहचला होता.परंतु परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिस पथकाला त्याने चुकीच्या पद्धतीने सॅल्यूट मारल्याने त्याचे बिंग फुटले.

१२ वी च्या परीक्षेला बुधवार ( २१ फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली.परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्षण विभागाची भरारी पथके, बैठी पथके आणि पोलिसांचा फौजफाटा परीक्षा केंद्रावर पाळत ठेवत आहेत.परंतु, तरीही कॉपीचा प्रकार घडला आहे.मात्र, परीक्षेत कॉपी पुरवण्यासाठी एका तरुणाने वेगळी शक्कल लढवल्याचे समोर आले.बहिणीला परीक्षेत कॉपी पुरवण्यासाठी भावाने पोलिसांचा गणवेश परिधान करून परीक्षा पोचला मात्र, तेथील अधिकाऱ्यांना चुकीचे सॅल्यूट मारला अन हा तरुण तोतया पोलीस असल्याचे उघड झाले.अनुपम मदन खंडारे (२४) असे या तरुणाचे नाव आहे.

हे ही वाचा:

जे.पी.नड्डा-चव्हाण यांची बंद दाराआड चर्चा…

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!

छोटे मोठे राहुल गांधी…

टीएमसी नेत्यांवर महिलांचे गंभीर आरोप

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये ही घटना घडली.आरोपी अनुपम याच्या बहिणीची परीक्षा या हायस्कूलमध्ये होती. २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर होता.मात्र, बहिणीचा इंग्रजी विषय कच्चा असल्याने भावाने ही शक्कल लढवली.अनुपमने बहिणीला कॉपी देण्यासाठी पोलिसाचा गणवेश परिधान करून परीक्षा केंद्रावर पोचला. त्याच वेळी पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्ताला पोहोचले. तेव्हा अनुपम देखील तिथेच उपस्थित होता.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपमने सॅल्यूट मारला.सॅल्युट मारताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अनुपमने परिधान केलेला पोलीस गणवेश आणि त्यावर असणारी नेमप्लेट चुकीची असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले.पोलिसांनी त्याची चौकशी करत त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉपी सापडल्या. यानंतर पोलिसांनी अनुपम खंडारे याला अटक करून त्याच्याविरुद्ध कलम ४१७, ४१९, १७०, १७१ आणि १९८२ च्या कलम-७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version