22 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषसामन्यात सर्वोत्तम असलेल्या खेळाडूने चक्क आपला पुरस्कार मित्राला दिला!

सामन्यात सर्वोत्तम असलेल्या खेळाडूने चक्क आपला पुरस्कार मित्राला दिला!

लहानग्याची खिलाडुवृत्ती पाहून वेंगसरकरही भारावले

Google News Follow

Related

कोणताही खेळ म्हटला की, त्यात खिलाडुवृत्तीही आलीच. एखाद्या खेळाडूला चुकून बाद दिले आणि प्रतिस्पर्धी खेळाडूने तो बाद नसल्याचे पंचांना सांगितले तर त्या खिलाडुवृत्तीचे कौतुक होते. पण माहुल चेंबूर येथील मैदानात वेगळाच किस्सा घडला.

या मैदानावर १३ वर्षांखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेत एका खेळाडूने चक्क आपल्याला मिळालेला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आपल्या सहकाऱ्याला प्रदान करत त्याचे कौतुक केले आणि आपण १३ वर्षांच्या स्पर्धेत खेळत असलो तरी आपण पुरेसे परिपक्व आहोत, याचेच दर्शन घडविले.

कोळी क्रिकेट फाऊंडेशन संघाच्या शॉन कोरगावकर याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५ बळी मिळविले आणि नाबाद ३० धावाही केल्या. त्यामुळे त्यांना गणेश पालकर क्रिकेट संघावर विजय मिळवत विजेतेपद जिंकता आले. या अष्टपैलू कामगिरीमुळे अर्थातच शॉनची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. पण तो पुरस्कार त्याने आपला सहकारी डॉनी डायस याला दिला. डॉनीने या सामन्यात ८ धावांत २ बळी घेतले पण त्याने छान गोलंदाजी करत आपल्याला आधार दिला असे सांगत शॉनने हा पुरस्कार आपल्या सहकाऱ्याला देण्याची विनंती केली.

या स्पर्धेत चारवेळा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविणाऱ्या शॉन कोरगावकर (११६ धावा आणि १६ बळी ) यालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आयुष शिंदे (दोन शतकांसह २३५ धावा), सर्वोत्तम गोलंदाज म्हणून शॉन कोरगावकर (१६ बळी) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्रेयश गोवरी यांना गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरणानंतर बोलताना भारताचे माजी कर्णधार आणि माजी राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले की, शिस्त, समर्पण आणि निर्धार या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास तुम्हाला तुमच्या क्रिकेट कारकिर्दीत यशोशिखर गाठणे आणि लवकरात लवकर आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचणे शक्य होईल.

१३ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
तत्पूर्वी, ३५ षटकांच्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाला २३.४ षटकांत केवळ सर्वबाद १०६ धावांचीच मजल मारता आली. आकाश मांगडे (३७) याचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. शॉन कोरगावकर याने आपल्या प्रभावी गोलंदाजीने केवळ २२ धावांत ५ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही, डॉंनी डायस याने ८ धावांत २ बळी मिळवत त्याला मोलाची साथ दिली.

हे ही वाचा:

एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी

या आव्हानाचा पाठलाग करताना कोळी क्रिकेट फौंडेशन संघाला मिहीर सावंत (१६) आणि प्रचित आमकर (२२) यांनी ४९ धावांची सलामी दिली आणि त्यानंतर वेद तेंडुलकर (नाबाद १५ ) आणि शॉन कोरगावकर (नाबाद ३०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाचा विजय साकार केला. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या निवड समितीचे माजी चेयरमन दीपक जाधव, एजिस फेडरेलचे व्हाईस प्रेसिडेंट प्रकाश ठाकर आणि मुंबई महागरपालिकेच्या “एम” वॉर्डचे विश्वास मोटे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

धावफलक – गणेश पालकर क्रिकेट क्लुब – २३.४ षटकांत सर्वबाद १०६ (आकाश मांगडे ३७ ; शॉन कोरगावकर २२/५ , डॉंनी डायस ८/२) पराभूत वि. कोळी क्रिकेट फौंडेशन २०.२ षटकांत २ बाद १०७ (मिहीर सावंत १६, प्रचित आमकर २२, वेद तेंडुलकर नाबाद १५, शॉन कोरगावकर नाबाद ३०).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा