26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषपाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक!

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मदला गुजरातमध्ये अटक!

गुजरात एटीएसची कारवाई

Google News Follow

Related

गुजरात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) रविवारी(२८ एप्रिल) मोठं यश मिळाले आहे.पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरात एटीएस पथकाने अटक केली आहे.मोहम्मद सकलेन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी आहे.

मोहम्मद सकलेनने भारतीय सिमकार्ड खरेदी करून त्यावर व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट केले होते. हा व्हॉट्सॲप क्रमांक पाकिस्तानमध्ये सक्रिय होता. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांच्या विरोधात हेरगिरी करण्यासाठी या क्रमांकाचा वापर केला जात होता आणि याची गोपनीय माहिती पाकिस्तानला लीक केली जात होती.दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरात एटीएसने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता आणि काही आरोपींना अटक करण्यात आली होती.यामध्ये मोहम्मद सकलेन हा फरार होता.अखेर मोहम्मदला गुजरात एटीएसने अटक केली आहे.

हे ही वाचा:

मोदी कन्नडिगांना पापी म्हणत असणारा एडिटेड व्हिडीओ प्रियांक खरगेंकडून व्हायरल

देबश्री चौधरींचे पोस्टर लावताना भाजपा नेत्या सरस्वती सरकार यांच्यावर प. बंगालमध्ये हल्ला

काँग्रेस संपत्तीच्या वाटणीसाठी वक्फ नव्हे, अन्य समुदायांची संपत्ती घेईल

काँग्रेस खोटे बोलून करतेय लोकांची दिशाभूल, भाजपकडून आरक्षणाला धक्का नाही!

गुजरात एटीएसला मिलिटरी इंटेलिजन्सकडून इनपुट मिळाले होते की, पाकिस्तानी एजन्सीचा एक गुप्तहेर भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या फोनवर संशयास्पद लिंक्स (मालवेयर व्हायरस) पाठवत आहे, त्यांचा फोन डेटा हॅक करत आहे आणि भारतीय सैन्याची गुप्त माहिती लीक करत आहे. यानंतर गुजरात एटीएसने या क्रमांकाची चौकशी केली असता हा क्रमांक जामनगर येथील मोहम्मद सकलेन याच्या नावाने नोंद असल्याचे समोर आले.अखेर मोहम्मद सकलेनच्या गुतजरात एटीएसने अटक केली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा