उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका मशिदीत अजान पठण करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. वादग्रस्त ठिकाणावरून अजान पठण करणाऱ्या मुस्लिम तरुणाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर गावप्रमुख प्रतिनिधीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली आहे.
शामली जिल्ह्यातील अहाता गौसगड गावात ४ बिघा जागेत २५० वर्षे जुनी जीर्ण इमारत आहे, ज्याला लोक मुघल काळातील मशीद मानतात. शुक्रवारी जलालाबाद शहरातील रहिवासी उमर कुरेशी याने वादग्रस्त इमारतीत पोहोचून अजान दिली आणि त्या प्रसंगाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावचे प्रमुख प्रतिनिधी नीरज कुमार यांनी ठाणे भवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली. मोडकळीस आलेल्या इमारतीत नमाज अदा करून १९४० च्या ब्रिटिश आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. १९४० च्या आदेशानुसार मशिदीत नमाज अदा करण्यास परवानगी नाही.
हे ही वाचा:
एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार
आंध्रप्रदेश: कोंबड्यांना धान्याऐवजी खायला दिले जाते वायग्रा आणि शिलाजीत!
पाच वर्षाच्या मुलीवर ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया
पोलिसांनी सांगितले की, बहुसंख्य समुदाय उध्वस्त झालेल्या इमारतीला मनहर राजांच्या किल्ल्याचा भाग मानतात, तर अल्पसंख्याक त्यावर मशीद असल्याचा दावा करतात. आमचे सहकारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, सामाजिक-सांस्कृतिक गट मनहर खेडा किल्ला कल्याण समितीचे सचिव भानू प्रताप सिंह म्हणाले की, हा परिसर १३५० पासून मनहर किल्ल्याचा भाग आहे. जिथे मनहरखेडचे हिंदू राजे राज्य करत होते. पुढे मुघलांनी त्यावर ताबा मिळवला. त्यानंतर त्याचे मशिदीत रूपांतर झाले, मात्र आज एकही मुस्लिम कुटुंब येथे राहत नाही.
भानू प्रताप यांनी सांगितले की, ब्रिटिश राजवटीत येथे वाद सुरू झाला होता, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. १९४० मध्ये जसमौर राज्याचे तत्कालीन डीएम आणि महाराजांच्या उपस्थितीत एक पंचायत झाली, ज्यामध्ये हे मान्य करण्यात आले की ही इमारत हिंदूंकडून पाडली जाणार नाही आणि या ठिकाणी मुस्लिम समाज नमाज पठण करणार नाही.तेव्हा पासून हा नियम लागू असल्याचे भानू प्रताप यांनी सांगितले