26 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषसर्पमित्राने कोब्राला बाटलीने पाणी पाजून दिले जीवनदान !

सर्पमित्राने कोब्राला बाटलीने पाणी पाजून दिले जीवनदान !

या दयाळू आणि धाडसी कृत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात सुप्त अवस्थेत सापडलेल्या कोब्राला एका पर्यावरण कार्यकर्त्याने थेट बाटलीतून पाणी पाजले. आश्चर्यकारक म्हणजे त्याने सापाला जिवंत करण्यात यश मिळविले. त्या सापाला पाणी पाजून पुन्हा एकदा जीवदान दिले आहे. पर्यावरण कार्यकर्त्याच्या दयाळू आणि धाडसी कृत्याचे चित्रण करणारा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान झाला आहे. व्हिडिओमध्ये कार्यकर्ता नागाला पाणी देऊन त्याला जिवंत करण्यात मदत करताना दिसत आहे.

 

कुणाच्याही घरी किंवा परिसरात साप निघाला की तातडीने सर्पमित्र नागरिकांच्या मदतीला धावून जातात आणि तेथील नागरिकांची सापापासून सुटका करून पकडण्यात आलेल्या सापाला दूरवर जाऊन जंगलात सुरक्षितपणे सोडले जातात. सापाचे संवर्धन करण्यात सर्पमित्रांचा मोठा हात असतो. तशीच एक घटना तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील तिरुचोपरूरचा येथे घडली. तिरुचोपरूरचा येथे राहणाऱ्या नटराजन यांना त्यांच्या घराजवळ सुप्तावस्थेत पडलेला कोब्रा सापडला.

हे ही वाचा:

शस्त्रे लुटण्यासाठी आलेल्या जमावाला लष्कराने रोखले; एक ठार

अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख

नटराजन यांनी सापाला शांत अवस्थेत पडलेला पाहून त्यांचा मित्र इझुमलाई यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर इझुमलाई यांनी त्वरित सर्पमित्र पर्यावरण कार्यकर्ता चेल्लाला याची माहिती दिली. चेल्ला घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना समजले की साप निर्जीव नसून त्याला पाण्याची गरज आहे. पर्यावरण कार्यकर्ता चेल्ला यांनी सापाची शेपूट घट्ट पकडून स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करत कोब्राला प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी देण्यास सुरुवात केली. साप पाणी पीत असल्याचे पाहिल्यास त्याने पाणी ओतणे सुरूच ठेवले आणि हळूहळू त्याची उर्जा परत मिळवण्यास मदत केली.

 

कोब्रा बरा होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर, चेल्लाने सापाला पकडण्यासाठी प्लास्टिकची मोठी बाटली वापरली आणि त्याला दूरवर जंगलात जाऊन सोडले.चेल्लाच्या जीव वाचवण्याच्या प्रयत्नांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सापाला पुन्हा एकदा जीवदान दिल्याने सर्पमित्राचे कौतुक केले जात आहे.बचाव कार्यादरम्यान, सर्पमित्र चेल्ला यांनी नटराजन आणि एझुमलाई यांना कळवले की, कोब्राने उंदराचे विष प्राशन केलेल्या उंदीराचे सेवन केले असावे, परिणामी तो निर्जलीकरण झाला आणि “बेशुद्ध” झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा