बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

राज्यसभेत बीजेडीची संख्या ८ वर

बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

ओडिशाच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा मानल्या जाणाऱ्या ममता मोहंता यांनी गुरुवारी (१ ऑगस्ट) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याआधी बुधवारी ममता मोहंता यांनी आपला जुना पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) सोडला होता. बीजेडी सोडण्याच्या घोषणेच्या काही वेळापूर्वी त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचाही राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ममता मोहंता यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि पक्षाचे ओडिशा प्रभारी विजयपाल सिंह तोमर यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ममता मोहंती म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेच्या सेवेच्या आदर्शाने प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे . हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी कोणत्याही कटाचा भाग म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ममता मोहंता यांनी कार्यकाळ संपण्याच्या दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना त्यांनी पत्र लिहून आपला राजीनामा दिला आणि तो त्यांनी स्वीकारला.

हे ही वाचा:

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का?

पूजा खेडकरला धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

महाराष्ट्राचा नेमबाज धोनीला का मानतो आदर्श !

श्री कृष्ण जन्मभूमी: मुस्लीम पक्षाला दणका, हिंदू पक्षाच्या याचिकांवर सुनावणी सुरू राहणार

ममता मोहंता यांच्या राजीनाम्याने बीजेडी मोठा धक्का बसला आहे. मोहंता यांच्या राजीनाम्यानंतर बीजेडीचे आता राज्यसभेत ८ सदस्य आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक आयोग लवकरच निवडणूक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version