डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.

डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागल्याची घटना मंगळवारी घडली. मात्र त्यामुळे बॅनर्जी यांना दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो अव्हेरत त्यांनी व्हीलचेअरवरच रुग्णालय सोडले.

अपघात झाल्यानंतर कोलकाताच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा एमआरआय स्कॅन केला. तेव्हा त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या आणि डाव्या मांडीच्या सांध्यांना दुखापत झाल्याचे उघड झाले. त्यामुळे एसएसकेएम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातच उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी हा सल्ला नाकारला. तसेच, घरीच उपचार सुरू ठेवले जातील, असे सांगून व्हीलचेअरवरच त्या घरी परतल्या.

आगामी पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी बॅनर्जी या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होत्या. त्यानंतर त्या कोलकाता येथे हेलिकॉप्टरने परतत होत्या, मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर सेवोके हवाई तळावर आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर हेलकावू लागले होते. त्यामुळे वैमानिकाला हैलिकॉप्टर हवाई तळावर उतरवावे लागले.

हे ही वाचा:

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण

वैन बीकची ‘सुपर कामगिरी’

…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!

हवाई तळावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न करताना ममता बॅनर्जी जखमी झाल्या. त्यानंतर त्या बागडोगरा विमानतळावरून विमानाने कोलकाता येथे परतल्या. ओडिशा आणि दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सोमवारी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता.

Exit mobile version