सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ममतांची बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी

पंतप्रधानांना लिहिले पत्र

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ममतांची बलात्कारविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्‍या प्रकरणानंतर पश्चिम बंगालसह देश हादरला होता. या प्रकरणावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारले आहे. अशातच आता पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलात्कारविरोधी कायदा आणखी कठोर करण्याची मागणी केली आहे.

कोलकातामधील आरजी कार हॉस्पिटलमध्‍ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्‍या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे एक भव्‍य मोर्चा काढून पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केली होती. आता यानंतर आज त्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलात्कारविरोधी कायदा आणखी कठोर करा, अशी मागणी केली आहे. या संबंधीचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’

स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधी यांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार…

अयोध्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खानचे शॉपिंग कॉम्प्लेक्स ‘भुईसपाट’

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्यावर गुन्हा

या प्रकरणी एकूणच न्यायालयाने ममता बॅनर्जी या विरोधी पक्षांच्‍या निशाण्यावर असून सर्वोच्‍च न्‍यायालयानेही या प्रकरणी त्यांच्या सरकारला फटकारले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बलात्कार-हत्या प्रकरण आणि त्यानंतर घटना घडलेल्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीमुळे तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणाची दखल घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकार हॉस्पिटलमधील तोडफोडीचा मुद्दा कसा हाताळू शकत नाही हे समजू शकत नाही.

Exit mobile version