28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषसंदेशखालीतील घटना ‘किरकोळ’

संदेशखालीतील घटना ‘किरकोळ’

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सांगणे...

Google News Follow

Related

प. बंगालमधील उत्तर २४ परगणामधील संदेशखाली गावात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटनेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून कमी महत्त्व दिले जात आहे. बिरभूम येथे झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी संदेशखालीची घटना किरकोळ असल्याचे नमूद करून भाजप आणि प्रसारमाध्यमे या घटनेचा बाऊ करत असल्याचे म्हटले आहे.

‘ही घटना घडली किंवा कदाचित घडवली गेली. पहिल्यांदा त्यांनी ईडीला पाठवले. त्यानंतर या नाट्यात भाजपचा प्रवेश झाला. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी या घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या किरकोळ घटनेचा बाऊ केला,’ असा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. घटनेने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर बॅनर्जी यांनी संदेशखालीत अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्याचे वचन दिले. मात्र महिलांवर अत्याचार सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी संदेशखाली प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्याचा उल्लेख केला, मात्र प्रमुख आरोपी शेख शहाजहान अजूनही फरार असल्याचे सोयीस्कररीत्या विसरल्या.

हे ही वाचा:

३७ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर ठरला निर्दोष!

अंदमानच्या जंगलात मिळाले म्यानमारच्या सहा शिकाऱ्यांचे मृतदेह!

दूरदर्शी नेते, संस्कृतीचे रक्षक, सुशासनाचे मूर्त रूप असलेले छत्रपती शिवराय अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी

“शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास नसून मानवतेचा सुगंध”

ममता बॅनर्जी यांनी राज्यातील बलात्काराच्या घटनेला याआधीही कमी महत्त्व दिले आहे. ६ फेब्रुवारी, २०१२ रोजी एका धावत्या गाडीमध्ये अँग्लो इंडियन महिला सुझेट जॉर्डन हिच्यावर पाच पुरुषांनी बलात्कार केला होता. ती कोलकात्यातील पार्क स्ट्रीट येथून घरी परतत होती. तेव्हा बॅनर्जी यांनी सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेला कट, असा या घटनेचा उल्लेख केला होता. तृणमूलचे खासदार धास्तिदार घोष यांनी पीडितेच्या चरित्रावर संशय व्यक्त करून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. तेव्हाच्या वाहतूकमंत्र्यांनीही पीडितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करून बलात्काराची तक्रार बनावट असल्याचे म्हटले होते. तीन वर्षांनंतर सन २०१५मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने बलात्काराची घटना झाल्याचे नमूद करून या प्रकरणी नासिर खान, रुमान खान आणि सुमित बजाज यांना दोषी ठरवले होते.

तसेच, सन २०१३मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेत चर्चेदरम्यान राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांचे कारण वाढत्या लोकसंख्या असल्याचे ममता यांनी म्हटले होते. तसेच, त्यांनी यासाठी आधुनिकता, शॉपिंग मॉल आणि मल्टिप्लेक्सच्या वाढत्या संख्येलाही बलात्काराच्या वाढत्या घटनांसाठी जबाबदार ठरवले होते. तर, त्याच वर्षी घडलेल्या बुर्दवान काटवा बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसताना त्यांनी बलात्कार झाल्याचा दावाही फेटाळून लावला होता. ‘बलात्कार झाल्याची ओरड राजकीय पक्ष करत आहेत. तेच सर्व हे नाटक करत आहेत. प. बंगालचे नाव खराब व्हावे, यासाठी ते असे नाटक करत आहेत,’ असा आरोप तेव्हा बॅनर्जी यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा