हवे तर मी खुर्ची सोडते, पण आंदोलन हे सरकार पाडण्यासाठी…

ममता बॅनर्जी यांचा आरोप

हवे तर मी खुर्ची सोडते, पण आंदोलन हे सरकार पाडण्यासाठी…

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंदोलक डॉक्टर संघटना यांच्यातील बोलणी फिस्कटली असून ममता बॅनर्जी यांनी प्रसंगी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली आहे. शिवाय, या सगळ्या आंदोलनामागे डाव्या पक्षांचा हात असल्याच आरोपही त्यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी असे म्हटले की, मी न्यायासाठी आपली खुर्ची सोडण्यास तयार आहे. मात्र कार रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात सुरू असलेले आंदोलन हे बंगालमधील सरकार पाडण्यासाठी सुरू आहे.

ममता बॅनर्जी यांनी याबाबत जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलक डॉक्टरांसोबत आपली चर्चा सुरूच राहणार आहे. डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आपले आंदोलन सुरू ठेवले आहे. १० सप्टेंबरला कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने त्यांच्या संघटनांना दिले होते.

हे ही वाचा:

मुस्लिमबहुल ताजिकिस्तानमध्ये हिजाब बंदी; पुरुषांना दाढी ठेवण्यास मनाई

यामिनी जाधवांच्या बुरखा वाटण्यावर भाजप सहमत नाही !

पॅरालिम्पिक पदकविजेत्या अवनीने पंतप्रधान मोदींना दिली भेट !

चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रभावित आहे. डाव्या पक्षांचा याला पाठिंबा आहे. मी न्यायासाठी आपली खुर्ची सोडायलाही तयार आहे पण त्यांना न्याय नको आहे. त्यांना हवी आहे ती खुर्ची.

सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक डॉक्टर आणि ममता बॅनर्जी सरकार यांच्यात चर्चा होणार होती पण ती फिस्कटली. डॉक्टरांचे शिष्टमंडळ ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी गेले होते पण या चर्चेचे थेट प्रक्षेपण व्हावे अशी त्यांची मागणी होती. त्यावर ममता यांचे म्हणणे होते की, सरकार चर्चेस पूर्ण तयार आहे आणि त्याचे थेट प्रक्षेपण झाल्यासही हरकत नाही पण हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे काही निर्बंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाची अशी जाहीर चर्चा करता येणार नाही. आम्ही त्यांच्या १५ जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी दिली होती पण ३४ सदस्य आले. तरीही आम्ही चर्चेची तयारी दाखविली. मात्र त्यांनी बैठकस्थळी येण्यास नकार दिला. डॉक्टरांच्या संपामुळे २७ जणांचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचे मुख्यमंत्री ममता यांनी म्हटले आहे.

 

 

Exit mobile version