बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरून अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराला आज पूर्णविराम मिळाला. दरम्यान, ‘बांगलादेशींनी आमचा दरवाजा ठोठावला तर आम्ही आश्रय देऊ’, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. कोलकाता येथे शहीद दिनाच्या रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता दीदी बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या,
‘बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे आपण चिडून जाऊ नये. बांगलादेशात अडकलेल्या बंगालमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचा टीएमसी सरकारला पूर्ण विश्वास आहे, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, बांगलादेशमध्ये युद्धग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या सर्वांना पाठिंबा मिळेल. बंगालचं भारताच्या अस्तित्वाला सुरक्षित ठेवू शकतो, त्याशिवाय कोणी नाही. निर्वासितांबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा उल्लेख केला आणि म्हणाल्या की, ‘बांगलादेशींनी आमचा दरवाजा ठोठावला तर आम्ही त्यांना आश्रय देऊ’. तसेच बंगालमध्ये झालेल्या जमावाच्या हल्ल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, लोकांवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि तो खपवून देखील घेतला जाऊ नये, जर कोणी दोषी आढळल्यास सरकार टीएमसी कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करेल, असे मुख्यमंत्री ममता म्हणाल्या.
हे ही वाचा:
अविमुक्तेश्वरानंद हे फेक शंकराचार्य; प्रियांका वड्रांनी दिली उपाधी!
बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !
इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !
मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व म्हणजे फाळणीपूर्व काळात नेण्याची चाल
दरम्यान, बांगलादेशाच्या सुप्रीम कोर्टाने देशातील आरक्षणासंदर्भात आज मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने ५६ टक्के आरक्षणाचा कोटा रद्द करत ७ टक्क्यांवर आणला. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना ५ टक्के आरक्षण तर २ टक्के जातीय अल्पसंख्याक, ट्रान्सजेंडर आणि अपंग यांना असणार आहे. उर्वरित सरकारी नोकऱ्यांमधील ९३ टक्के पदे ही गुणवत्तेच्या आधारावर भरण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले.