27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषराहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!

राहुल गांधींचा पत्ता कट, ममता म्हणतात खरगे पंतप्रधानपदाचा चेहरा!

निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल,मल्लिकार्जुन खर्गे

Google News Follow

Related

इंडी आघाडीची नवी दिल्लीत आज मंगळवार १९ डिसेंबर रोजी बैठक पार पडली.या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४ मध्ये इंडी आघाडीचे सरकार आल्यास पंतप्रधान म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले.या पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे योग्य उमेदवार असू शकतात.तथापि, आगामी काळातील येणाऱ्या निवडणुकीत युती जिंकल्यानंतर हा निर्णय घेण्यात येईल असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.ममता बॅनर्जी यांच्या मागणीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीदेखील पसंती दिली.पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावामुळे ममता यांनी राहुल गांधी याना पसंती दिली नसल्याचे दिसत आहे.

इंडी आघाडीतील अनेक नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांचे नाव असावे, अशी इच्छा टीएमसी आणि जेडीयू नेत्यांची होती.सोमवारी बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले होते की, युतीने निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय घेतला पाहिजे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, जेव्हा अनेक राजकीय पक्ष एकत्र असतात तेंव्हा ही लोकशाही असते, भिन्न राज्ये, भिन्न विचार आणि भिन्न मते असतात, परंतु शेवटी भारत हे एक व्यासपीठ आहे जिथे आपण एकत्र लढत आहोत. भाजपचा कोणताही मित्रपक्ष नाही. एनडीए गेली. आम्ही तसे नाही.निवडणुकीनंतर निकाल पहावे लागतील आणि नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा लागेल. हे सर्व पक्ष ठरवतील, त्या म्हणाल्या.

दरम्यान, दलित चेहरा म्हणून खरगे यांचे नाव पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे का याचीही चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.तसेच राहुल गांधी यांना मात्र ममता यांनी पसंती दिलेली नसल्याचे चित्र समोर आले आहे.

हे ही वाचा:

नोटांवर एका माणसाचाच फोटो का? सावरकर,टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो कधी येणार?

तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले

ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा

लोकसभेत टेलिकॉम विधेयक सादर

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
बैठक पार पडल्यानंतर खर्गे म्हणाले की, निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल.आम्हाला प्रथम जिंकून यावे लागेल.आमच्याकडे जर खासदारचं नसतील तर पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करून काही उपयोग नाही.ते म्हणाले की, भारत आघाडीच्या चौथ्या बैठकीत २८ पक्ष सहभागी झाले होते. “भविष्यात युती कशी चालली पाहिजे यावर सर्व पक्षांनी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटपावर ते म्हणाले की, स्थानिक नेते प्रथमतः यावर चर्चा करतील, मतभेद न सुटल्यास वरिष्ठ नेते हस्तक्षेप करतील.”यूपी, तेलंगणातील जागावाटपाचे प्रश्न सोडवले जातील. पंजाब आणि दिल्लीचे प्रश्न कसे सोडवता येतील हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करू,ते पुढे म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदी खर्गे यांचे नाव सुचवल्यानंतर एमडीएमके खासदार वायको म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी खर्गे यांचे नाव सुचवले त्याला कोणाचा विरोध न्हवता.जेएमएमचे खासदार महुआ माझी म्हणाल्या की, मुख्य चर्चा जागा वाटपावर होती.पंतप्रधानांच्या चेहऱ्याबाबतही चर्चा झाली. कोणताही अंतिम निर्णय झाला नाही… सर्वजण म्हणाले की, निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधानांचा चेहरा ठरवला जाईल,” त्या पुढे म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा